परवानगी न घेताच डॉक्टरने अनेक महिलांना केलं प्रेग्नेंट, अनेक वर्षांनी दोन बहिणींनी केला भांडाफोड
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 11:34 AM2022-01-05T11:34:36+5:302022-01-05T11:35:12+5:30
प्रेग्नेन्सीमध्ये येणाऱ्या समस्यांमुळे महिलांना डॉक्टरांची मदत घ्यावी लागते. कधी कधी डॉक्टरांचा सल्ला आणि उपचाराच्या माध्यमातून महिला प्रेग्नेंट होतात.
कुठेही डॉक्टरला देवासमान मानलं जातं. रूग्णाला ठीक करण्यासाठी किंवा आपल्या चांगल्या ट्रीटमेंटसाठी डॉक्टरवर डोळे बंद करून लोक विश्वास ठेवतात. मात्र, अमेरिकेतील एका डॉक्टरने मानवतेला काळिमा फासण्याचं काम केलं आहे. या आरोप डॉक्टरने अनेक महिलांची फसवणूक केली. पण आता त्याचा भांडाफोड झाला आहे.
प्रेग्नेन्सीमध्ये येणाऱ्या समस्यांमुळे महिलांना डॉक्टरांची मदत घ्यावी लागते. कधी कधी डॉक्टरांचा सल्ला आणि उपचाराच्या माध्यमातून महिला प्रेग्नेंट होतात. औषधोपाचारानेही प्रेग्नेंट न राहू शकणाऱ्या महिला फर्टिलिटी क्लीनिककडे वळतात.
डॉक्टरने महिलांची केल फसवणूक
पती-पत्नीला फर्टिलिटी सेंटरकडून (IVF) अपेक्षा असतात की, त्यांच्याही घरात लहान बाळ येईल. अशात फर्टिलिटीच्या समस्येने हैराण कपल डॉक्टरांकडे आशेने येतात. पण अनेकदा त्यांची फसवणूकही होते. हा डॉक्टर असाच विश्वासघात करणारा निघाला. डॉक्टरने त्याच्या स्पर्मनेच त्याच्या क्लीनिकमध्ये आलेल्या महिलांना प्रेग्नेंट केलं. डॉक्टरने कोणत्याही महिला किंवा त्याच्या पतींना सांगितलं नाही की, तो प्रेग्नेन्सीसाठी त्याच्या स्पर्मचा वापर करत आहे.
दोन बहिणींनी केला डॉक्टरचा भांडाफोड
या आरोपी डॉक्टरचं नाव आहे पॉल जोन्स. पॉल जोन्स बऱ्याच काळापासून त्याच्या क्लीनिकमध्ये येणाऱ्या महिलांसोबत असं करत आहे. डॉक्टरच्या या कृत्याबाबत दोन बहिणींनी टीव्ही शोमध्ये खुलासा केला. 'डेली स्टार'च्या वृत्तानुसार, दोन बहिणी माइया सिमन्स आणि ताहनी स्कॉटने न्यूज प्रोग्राम The Truth About My Conception वर डॉक्टरच्या या कृत्याचा भांडाफोड केला.
बहिणींचे आई-वडील डॉक्टरला भेटले होते
या दोन बहिणींचे वडील जॉन इमंस टेस्टिकुलर कॅन्सरन पीडित होते आणि बाळाला जन्म देण्यात सक्षम नव्हते. १९८० आणि १९८५ मध्ये हे कपल आरोपी डॉक्टर पॉलला भेटायला त्याच्या क्लीनिकमध्ये गेलं होतं. डॉक्टरने त्यांना न सांगता आपल्या स्पर्मने महिलेला प्रेग्नेंट केलं होतं.
Ancestry.com वर आला होता मेसेज
बराच काळ गेल्यावर माइयाला २०१८ मध्ये Ancestry.com वर कुणीतरी मेसेज केला. Ancestry.com वर लोक आपल्या पिढ्या आणि पूर्वजांचा शोध घेतात. यावर जेनेटिक आधावर एकमेकांचा शोध घेतला जातो. माइयाला जो मेसेज मिळाला होता, त्यात लिहिलं होतं की, 'असं वाटतं की, आपण बहीण-भाऊ आहोत. माझे वडील कोलरडोमध्ये स्पर्म डोनर आहे. मी आपल्यासारख्या दिसणाऱ्या तीन बहीण भावांना शोधलं आहे'.
डॉक्टरचं मेडिकल लायसन्स जप्त
यानंतर माइया आणि ताहनीने जेनेटिक टेस्टिंग वेबसाइटच्या माध्यमातून आपल्या १२ भाऊ-बहिणींना शोधलं. माइयाला जेव्हा याबाबत समजलं तेव्हा ती चांगलीच संतापली होती. माइया म्हणाली की, मला याबाबत ३८ वर्षांनंतर समजलं. दरम्यान हे प्रकरण समोर आल्यानंतर डॉक्टर जोन्सचं मेडिकल लायसन्स २०१९ मध्ये जप्त करण्यात आलं होतं.