आॅफिसच्या मीटिंगमध्ये स्मार्टफोन वापरता? मग हे जरूर वाचा...
By admin | Published: April 12, 2015 01:11 AM2015-04-12T01:11:09+5:302015-04-12T01:11:09+5:30
तुम्ही कंपनीच्या, आॅफिसच्या मिटिंगमध्ये स्मार्टफोन बाहेर काढता तेव्हा तुम्ही तुमचे बॉस आणि सहकाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरता.
वॉशिंग्टन : तुम्ही कंपनीच्या, आॅफिसच्या मिटिंगमध्ये स्मार्टफोन बाहेर काढता तेव्हा तुम्ही तुमचे बॉस आणि सहकाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरता. हे कुणाचे वैयक्तिक मत नाही तर विद्यापीठाने (युनिव्हर्सिटी आॅफ साऊथर्न कॅलिफोर्निया) केलेले हे सर्वेक्षण आहे. मार्शल स्कूल आॅफ बिझिनेसने या मनोरंजक, पण तेवढ्याच महत्त्वाच्या विषयावर सर्वेक्षण करताना ४० वर्षांवरील संबंधितांची मते जाणून घेतली आहेत.
ज्यांचा पगार ३० हजार डॉलर्सपेक्षा अधिक आहे, अशा ५५४ पूर्ण वेळ व्यावसायिकांचे हे सर्वेक्षण आहे. विशेष म्हणजे यात अशाच लोकांची मते जाणून घेण्यात आली आहेत, ज्या कंपन्यांमध्ये ५० पेक्षा अधिक कर्मचारी काम करतात. त्यांना मिटिंग व स्मार्टफोनबाबत अनेक प्रश्न विचारण्यात आले आणि त्यातून अनेक गमतीदार उत्तरे आली.
मीटिंगमध्ये स्मार्टफोन वापरणे अयोग्य आहे, असे यशस्वी लोकांना का वाटते? भर मीटिंगमध्ये तुम्ही फोन बाहेर काढता तेव्हा इतरांना जे वाटते, ते असे-
४सन्मानाचा अभाव : तुम्ही मीटिंगमध्ये असताना तुमच्यासमोर चाललेल्या चर्चेपेक्षा फोनवरील माहिती तुम्हाला जास्त महत्त्वाची वाटते. तुमच्या समोर बसलेल्यांपेक्षा फोनवर बोलणारी व्यक्ती तुमच्यासाठी जास्त महत्त्वाची आहे.
४दुसऱ्यांच्या हातचे बाहुले : तुम्ही नव्या जमान्यातील पॅव्हलोव्हियन कुत्र्यासारखे आहात. हे कुत्रे प्रशिक्षित असतात व दुसऱ्याच्या प्रत्येक कृतीला प्रतिसाद देण्याचे त्यांना शिकवले जाते, तसेच कुणीही, कोणत्याही वेळी (मीटिंगमध्येही) फोन केला तरी तो घेता.
४लक्ष नाही : तुम्ही एका वेळी एकाच विषयावर लक्ष केंद्रित करण्यास असमर्थ आहात.
४आत्मभान नाही : मीटिंग चालू असताना फोन घेणे म्हणजे इतरांशी कसे वागत आहात, हे कळतही नाही.
४सामाजिक भान नाही : तुमच्या अशा वागण्याने इतरांवर काय परिणाम होतो, हेही तुम्हाला कळत नाही.
...अन्यथा स्मार्टफोन जमा करावे लागतील
४विशेष म्हणजे मिटिंग आणि स्मार्टफोनबद्दल आपण इतरांकडून जशा वागण्याची अपेक्षा करतो, आपण तसे वागतो का, हेही प्रत्येकाने तपासून पाहिले पाहिजे. अन्यथा मिटिंग रूमच्या बाहेर एक बास्केट ठेवून त्यामध्ये सर्वांचे स्मार्टफोन जमा करावे लागतील, अशी वेळ येणे फार दूर नाही.