भारताची हवा खराब म्हणणाऱ्या अमेरिकेचीच हवा "घाणेरडी", रिपोर्टमधून खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2020 12:07 PM2020-10-28T12:07:08+5:302020-10-28T12:10:19+5:30
Donald Trump : भारत विषारी हवा सोडणारा देश म्हणणाऱ्या अमेरिकेची हवा खराब असल्याची माहिती आता समोर आली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी भारतावर टीका केली होती."भारत हा विषारी हवा सोडणारा देश आहे" असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं होतं. ट्रम्प यांनी अध्यक्षीय वादविवादात पर्यावरण बदल आणि कार्बन उत्सर्जनाच्या मुद्यावर आपल्या धोरणांचा बचाव करण्यासाठी भारत, चीन आणि रशियावर निशाणा साधला होता. 'अमेरिका हा सर्वात कमी कार्बन उत्सर्जन करतो. त्या उलट चीन, भारत आणि रशिया आपल्या देशातील हवेच्या स्तराचा विचार करत नाही. या तीन देशांतील हवेचा स्तर अतिशय वाईट आहे' असं म्हणत हे देश प्रदूषणाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला होता.
भारत विषारी हवा सोडणारा देश म्हणणाऱ्या अमेरिकेची हवा खराब असल्याची माहिती आता समोर आली आहे. अमेरिका हा सर्वात कमी कार्बन उत्सर्जन करतो असं ट्रम्प यांनी म्हटलं होतं. मात्र आकडेवारीतून सत्य समोर आलं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण विभागाने 2019 मध्ये एमिशन गॅप रिपोर्ट प्रकाशित केला होता. त्यानुसार याआधी आणि आताही अमेरिकेत सर्वात जास्त ग्रीन हाऊस गॅसचं उत्सर्जन होत आहे. ग्रीन हाऊस गॅसच्या दरडोइ उत्सर्जनाचा विचार केल्यास अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे आणि एकूण उत्सर्जनाचा बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
बायडन यांनी ट्रम्प यांच्यावर साधला निशाणा, म्हणाले...https://t.co/XLv0MtKtsW#USElection2020#JoeBiden#DonaldTrump#India
— Lokmat (@MiLOKMAT) October 25, 2020
"ट्रम्प प्रशासनाकडे ग्रीन गॅसचे उत्सर्जन कमी करण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना नाही"
क्लायमेट अॅक्शन ट्रॅकरने दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या या संकटात अमेरिकेत विषारी वायूंचे उत्सर्जन हे 10 टक्क्यांनी कमी होणार आहे. या चर्चेमध्ये कोणत्याही प्रश्नावर ट्रम्प यांच्याकडे योग्य नीती नाही असं दिसलं. ट्रम्प प्रशासनाकडे ग्रीन गॅसचे उत्सर्जन कमी करण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना नाही. डाउन टू अर्थच्या रिपोर्टनुसार कोरोनाच्या काळात तापमान कमी होणार आहे. त्यामुळे या काळात कमी झालेले तापमान हे आमच्या पर्यावरण नीतीमुळे कमी झाल्याचं सांगत ट्रम्प प्रशासन याचं श्रेय घेईल असं देखील रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
"शुद्ध हवा, वन्यजीवन आणि विषारी केमिकल या बाबतीतही ट्रम्प प्रशासन ठरलं अयशस्वी "
निवडणुकीनंतर ट्रम्प सरकार पॅरिस करारामधून बाहेर पडण्याची तयारी करत आहे. त्यामुळे इराण आणि तुर्कीप्रमाणेच अमेरिकादेखील या करारातून बाहेर पडेल. त्याचबरोबर शुद्ध हवा, वन्यजीवन आणि विषारी केमिकल या बाबतीतही ट्रम्प प्रशासन अयशस्वी ठरलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. "भारत हा विषारी हवा सोडणारा देश आहे" असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं होतं. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या या विधानावरून डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन यांनी ट्रम्प यांना सुनावलं आहे.
भारत, रशिया आणि चीनवर साधला निशाणा, म्हणाले...https://t.co/B8NiR1sfWz#DonaldTrump#America#Indiapic.twitter.com/Oy9jy3ah70
— Lokmat (@MiLOKMAT) October 23, 2020
भारत विषारी हवा सोडणारा देश म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना बायडन यांनी सुनावलं
ट्रम्प यांनी भारतातबाबत केलेल्या विधानावर ज्यो बायडन यांनी नाराजी व्यक्त केली आहे. बायडन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचे ट्विट केले आहे. "राष्ट्रपती ट्रम्प यांनी भारताला घाणेरडं म्हटलं आहे. मित्रांविषयी कसं बोलायला हवं, हे पण माहिती नाही आणि जागतिक स्तरावरील हवामान बदलाच्या आव्हानांना कसं सोडवायला हवं. आपण आणि सहकारी कमला हॅरिस आम्ही दोघंही भारत अमेरिका यांच्यातील मैत्रीला महत्त्व देतो" असं बायडन यांनी म्हटलं आहे.
CoronaVirus News : डोनाल्ड ट्रम्प यांचा अजब दावाhttps://t.co/1n73VnEhCJ#coronavirus#DonaldTrump#Americapic.twitter.com/kKGN47eUZs
— Lokmat (@MiLOKMAT) October 28, 2020