डॉल्फिनचा हव्यास जीवावर बेतला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 05:03 AM2017-08-18T05:03:27+5:302017-08-18T05:03:31+5:30
दक्षिण स्पेनमध्ये ११ आॅगस्ट रोजी पर्यटकांच्या फोटो काढण्याच्या हव्यासापायी पिल्लू डॉल्फिनचा जीव गमावून बसले
माद्रिद : दक्षिण स्पेनमध्ये ११ आॅगस्ट रोजी पर्यटकांच्या फोटो काढण्याच्या हव्यासापायी पिल्लू डॉल्फिनचा जीव गमावून बसले. या डॉल्फिनभोवती पर्यटकांचा गराडा पडला व त्याचा मृत्यू झाला. हे पिल्लू अजून अंगावर पिणारेच होते. ते पर्यटकांच्या गर्दीत त्याच्या आईपासून वेगळे पडले. शेकडो पर्यटकांची धडपड पिल्लू डॉल्फिनसोबत फोटो काढण्यासाठी सुरू होती. अशा गर्दीमुळे डॉल्फिन खूप तणावाखाली येतात, असे सांगितले जाते. अनेक लोकांना डॉल्फिनशी कसे वागावे व त्यांच्यावर कसे नियंत्रण ठेवावे हे समजत नाही. अनेकांनी त्याला घेरून ठेवले होते. कोणी त्याच्या पाठीवर हात मारत होते.सागर संरक्षणवादी काही कृती करायच्या आधीच पिल्लू डॉल्फिन मेले होते. ज्या पर्यटकांनी त्या पिल्लाला हात लावला, ते काही त्याच्या मृत्युचे कारण नव्हते. परंतु त्यांनी त्याला काही मदतही केली नाही. एक तर ते पिल्लू आजारी असेल किंवा त्याच्या आईपासून दूर गेल्यामुळे त्याच्या मृत्यू झाला असावा. सागर संरक्षणवादी काही कृती करायच्या आधीच पिल्लू डॉल्फिन मेले होते. ज्या पर्यटकांनी त्या पिल्लाला हात लावला, ते काही त्याच्या मृत्युचे कारण नव्हते. परंतु त्यांनी त्याला काही मदतही केली नाही. एक तर ते पिल्लू आजारी असेल किंवा त्याच्या आईपासून दूर गेल्यामुळे त्याच्या मृत्यू झाला असावा. आईशिवाय अशी पिल्ले सहसा जिवंत राहत नाहीत. मानवाच्या स्वार्थापायी अनेक प्राणी, पक्षी एकटे पडतात, त्यांची उपासमार होते, ते दडपणाखाली असतात व त्यांना त्यांच्या आईपासून वेगळे व्हावे लागते. पर्यटकांना त्यांच्यासोबत एखादा फोटो काढायचा असतो. मग त्याचा जीव गेला तरी चालेल, असे त्यांचे वर्तन असते.