डॉल्फिन मासा पडला होता शिक्षिकेच्या प्रेमात
By admin | Published: June 11, 2014 11:07 PM2014-06-11T23:07:00+5:302014-06-11T23:07:00+5:30
प्राणी माणसावर प्रेम करतात; पण प्रियकर आणि प्रेयसीच्या नात्याने माणूस व प्राण्याचे प्रेम आजही दुर्मिळ मानले जाते.
लंडन : प्राणी माणसावर प्रेम करतात; पण प्रियकर आणि प्रेयसीच्या नात्याने माणूस व प्राण्याचे प्रेम आजही दुर्मिळ मानले जाते. प्राण्यांवर संशोधन करणाऱ्या एका महिलेने आपल्यावर एका नर डॉल्फिनचे प्रेम बसले होते असा दावा केला आहे.
१९६५ साली नासाच्या एका प्रयोगांतर्गत पीटर नावाच्या डॉल्फिन माशाला इंग्रजी बोलण्यास शिकवत असताना हा मासा आपल्या प्रेमात पडला असा दावा मार्गारेट होवे लोवाट नावाच्या महिलेने केला आहे. बीबीसीने यावर वृत्तपट तयार केला असून, त्याचे नाव द गर्ल हू टॉक्ड टू डॉल्फिन्स असे आहे. लोवाट त्यावेळी २३ वर्षांची होती. अमेरिकेतील व्हर्जिन आयलंडवर ती या डॉल्फिनसोबत राहत असे. ते दोघे एकत्र खात, स्रान करत खेळत आणि झोपत. मेंदूतज्ज्ञ डॉ. जॉन लिली हा प्रयोग करत असत, व लोवाट त्यांना मदत करत असे.
या कालावधीत लोवाटने त्याला इंग्रजी बोलण्यास शिकवले. पीटर हॅलो मार्गारेट असे म्हणून तिचे स्वागत करत असे. एम अक्षर उच्चारणे त्याला अत्यंत अवघड गेले; पण प्रयत्नाने तिने त्याला वुई, ट्रँगल, हॅलो, वर्क, प्ले असे शब्द बोलायला शिकवले. पीटरशी आपले भावनिक संबंध जुळल्याचे लोवाटने मान्य केले आहे, बीबीसीवर १७ जून रोजी हा वृत्तपट दाखवला जाणार आहे. (वृत्तसंस्था)