डॉल्फिन आणि व्हेल होते मांसभक्षक प्राणी
By Admin | Published: February 7, 2017 02:01 AM2017-02-07T02:01:40+5:302017-02-07T02:01:40+5:30
डॉल्फिन आणि व्हेल हे मांसभक्षक प्राणी होते. त्यांचे जमिनीवर वास्तव्य होते. उत्क्रांतीनंतर ते समुद्री प्राणी बनले. मगरीसारखी डोक्याची कवटी
डॉल्फिन आणि व्हेल हे मांसभक्षक प्राणी होते. त्यांचे जमिनीवर वास्तव्य होते. उत्क्रांतीनंतर ते समुद्री प्राणी बनले. मगरीसारखी डोक्याची कवटी, पायांकडील जाळीदार भाग असा हा उत्क्रांतीचा प्रवास आहे. अखेर जलचर प्राणी म्हणून तो पाण्यात स्थिरावला. यांचे पूर्वज पाण्यात किंवा समुद्रकिनारी आपला बहुतांश वेळ घालवत असावेत. अर्थात, ही उत्क्रांती कोट्यवधी वर्षांची आहे. त्यातून हा बदल घडत गेलेला आहे. हे प्राणी जमिनीवर अधिक समाधानी नव्हते, म्हणूनच ते पुन्हा पाण्यात स्थिरावले. पाण्याच्या माध्यमातून त्यांना अन्नाचे अनेक स्रोत उपलब्ध आहेत. त्यांच्या समुद्रात परत जाण्याचे हेही एक कारण असावे. समुद्रातून पाण्याच्या वर झेपावणारा आणि पुन्हा पाण्यात दिसेनासा होणारा व्हेल अनेकांनी पाहिला असेल. कधी काळी हा व्हेल मांसभक्षक जमिनीवरील प्राणी होता. उत्क्रांतीच्या टप्प्यात तो आता समुद्रातील प्राणी झाला असून, तेच त्याचे निवास झाले आहे.