अफगाण महिलांनी अमेरिकेवर विश्वास ठेवला, पण ट्रम्प यांनी धोका दिला...! आता सुरू आहे मोठी तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 16:59 IST2025-03-09T16:58:43+5:302025-03-09T16:59:21+5:30

या महिला तालिबान राजवटीतून पळून ओमानमध्ये उच्च शिक्षणासाठी गेल्या होत्या...

Donald trump after usaid funding cuts afghan women who fled country now forced to return in taliban rule | अफगाण महिलांनी अमेरिकेवर विश्वास ठेवला, पण ट्रम्प यांनी धोका दिला...! आता सुरू आहे मोठी तयारी

अफगाण महिलांनी अमेरिकेवर विश्वास ठेवला, पण ट्रम्प यांनी धोका दिला...! आता सुरू आहे मोठी तयारी

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एका निर्णय ८० हून अधिक अफगाण महिलांसाठी धोक्याची घंटा ठरला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी विश्वासघाता केल्याची या महिलांची भावना आहे. जगभरात महिलांच्या हक्कांसंदर्भात भाष्य करणार्या अमेरिकन प्रशासनाने, आता या महिलांना तालिबानच्या भयावह राजवटीत परतण्यास भाग पाडले आहे. या महिला तालिबान राजवटीतून पळून ओमानमध्ये उच्च शिक्षणासाठी गेल्या होत्या. मात्र, ट्रम्प प्रशासनाने परदेशी मदत कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात कपात केल्यानंतर, आता या महिलांना अफगाणिस्तानात परत पाठवण्याची तयारी सुरू आहे.

मुलींची शिष्यवृत्ती रोखली - 
डोनाल्ड ट्रम्प जानेवारी महिन्यात सत्तेवर आले. यानंतर, त्यांनी निधी रोखण्याचा निर्णय घेतल्यानंतर, यूएस एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेन्टकडून (USAID) निधी पुरवल्या जाणाऱ्या या अफगाण महिलाची शिष्यवृत्ती अचानक बंद करण्यात आली. भीती मुळे नाव जाहीर न करण्याच्या अटीवर एका विद्यार्थिनीने बीबीसीसोबत बोलताना सांगितले की, हे हृदयद्रावक आहे. सर्वजण काळजीत आहेत आणि रडत आहेत. दोन आठवड्यांच्या आता परत पाठवले जाईल, असे आम्हाला सांगण्यात आले आहे.

सुमारे चार वर्षांपूर्वी ऑगस्ट २०२१ मध्ये सत्तेत आल्यापासून तालिबानने महिलांवर कठोर निर्बंध लादले आहेत. महिलांचा शिक्षणाचा अधिकार काढून घेण्यात आला आहे. या काळात, USAID कार्यक्रमांतर्गत संरक्षण मिळालेल्या अनेक अफगाण महिला देश सोडून पळून गेल्या. मात्र, आता व्हाईट हाऊसने परदेशी मदत कार्यक्रम बंद करण्याच्या आणि अब्जावधी डॉलर्सच्या निधीत कपात करण्याचा निर्णय घेतल्याने जगभरातील मानवतावादी कार्यक्रमांना मोठा धक्का बसला आहे.

अफगान महिलांकडून मदतीचं आवाहन -
आपल्याला अफगाणिस्तानात परत पाठवम्याची तयारी सुरू असल्याचे ओमानमध्ये शिक्षण घेत असलेल्या अफगाण महिलांचे म्हणणे आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला त्वरित हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे. यासंदर्भात, यूएसएआयडीचा निधी संपल्याने शिष्यवृत्ती थांबवण्यात आली असल्याचे संबंधित महिलांना ई-मेल द्वारे करळवण्यात आले आहे.
 

Web Title: Donald trump after usaid funding cuts afghan women who fled country now forced to return in taliban rule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.