अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प पर्वाला सुरुवात!

By admin | Published: January 20, 2017 09:33 PM2017-01-20T21:33:39+5:302017-01-20T23:20:10+5:30

मेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यास सुूरुवात झाली आहे

Donald Trump Begins in America! | अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प पर्वाला सुरुवात!

अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प पर्वाला सुरुवात!

Next

 ऑनलाइन लोकमत

वॉशिंग्टन, दि. 20 -अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष  डोनाल्ड ट्रम्प यांनी देशाचे 45 वे राष्ट्रपती म्हणून आज शपथ घेतली. अमेरिकन परंपरेप्रमाणे बायबलवर हात ठेवत अमेरिकेच्या मुख्य न्यायाधीशांकडून ट्रम्प यांनी पद आणि गोपनीयतेची शपख घेतली. शपथविधी सोहळ्यात उपाध्यक्ष माइक पेन्स यांनाही पदाची शपथ देण्यात आली. यावेळी  मावळते अध्यक्ष बराक ओबामा, माजी अध्यक्ष जॉर्ज बुश, बिल क्लिंटन आणि जिमी कार्टर यांच्यासह लाखो अमेरिकी नागरिक उपस्थित होते.  

राष्ट्राध्यक्षाने 20 जानेवारीला शपथ घेण्याची परंपरा गेल्या 200 वर्षांपासून अमेरिकेत पाळली जात आहे.  यावेळीही ही परंपरा कायम राहिली.  ट्रम्प यांनी ऐतिहासिक परंपरेनुसार लिंकन बायबलवर हात ठेवून राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली.  अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी ट्रम्प यांना अध्यक्षपदाची शपथ दिली.   नोव्हेंबरमध्ये झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्यावर मात केली होती.

नरेंद्र मोदींकडून शुभेच्छा ..!
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरुन त्याचं अभिनंदन केलं आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिला.
  शपथविधी सोहळ्यादरम्यान निदर्शने
डोनाल्ड ट्रम्प यांच्या शोहळ्यादरम्यान कॅपिटल हिलच्या बाहेर काही आंदोलकांनी ट्रम्प यांच्या विरोधात घोषणाबाजी करत निदर्शने केली. यावेळी निदर्शने करणा-या आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागल्याचे समजते.

 

 
 

- डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली 

- माइक पेन्स यांनी घेतली अमेरिकेच्या उपाध्यक्षपदाची शपथ

- शपथविधी  सोहळ्यासाठी आठ लाख अमेरिकन नागरिकांची उपस्थिती

- ट्रम्प दोन बायबलवर  हात ठेवून घेणार शपथ, दोन पैकी एक बायबल ट्रम्प यांना त्यांच्या आईवे दिले होते, तर दुसरे लिंकन बायबल 

- ट्रम्प यांच्या शपथग्रहण समारोह सुरू असलेल्या स्थळाबाहेर पोलीस आणि आंदोलकांमध्ये वादावादी. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर 

- शपथविधीपूर्वी ट्रम्प यांनी केले उपस्थितांना अभिवादन 

- काही वेळातच ट्रम्प घेतील अध्यक्षपाची शपथ 

- अमेरिकेचे माजी अध्यक्ष जिमी कार्टर  यांचीही शपथविधी सोहळ्यासाठी हजेरी

- अमेरिकेच्या नव्या फर्स्ट लेडी मेलेनिया ट्रम्प शपथविधी सोहळ्यासाठी दाखल 

- अमेरिकेच्या मावळत्या फर्स्ट लेडी मिशेल ओबामा आणि सेकंड लेडी जिल बिडेन यांचे शपथविधी सोहळ्यासाठी कॅपिटल हिल येेथे आगमन 

- ट्रम्प यांच्या शपथविधीसाठी कॅपिटल हिल येथे अमेरिकन नागरिकांची गर्दी 

- डोनाल्ड ट्रम्प शपथविधीसाठी कॅपिटल हिल येथे दाखल 

- शपथविधी सोहळ्यासाठी डोनाल्ड ट्रम्प मावळते अध्यक्ष बराक ओबामा यांच्यासह कॅपिटल हिलकडे रवाना 

- ट्रम्प यांच्या शपथविधीसाठी माजी अध्यक्ष जॉर्ज बुश आणि त्यांची पत्नी लॉरा बुश तसेच माजी अध्यक्ष बिल क्लिंटन आणि हिलेरी क्लिंटन व्हाइट हाऊसमध्ये दाखल  

Web Title: Donald Trump Begins in America!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.