डोनाल्ड ट्रम्प यांनी WWE रिंगणात CNN ला "बदडलं"!
By admin | Published: July 4, 2017 05:44 PM2017-07-04T17:44:55+5:302017-07-04T20:27:56+5:30
राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यापासून प्रसारमाध्यमं अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 4 - राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यापासून प्रसारमाध्यमं अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर आहे. शनिवारी एका रॅलीला संबोधित करताना त्यांनी मीडियावरील आपला रोष पुन्हा एकदा व्यक्त केला आणि मीडियाला बोगस म्हटलं. याशिवाय डब्लूडब्लूईच्या रिंगणाबाहेर ट्रम्प "सीएनएन" या वृत्तवाहिनीला मारत असल्याचा व्हिडिओ त्यांनी पोस्ट केला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी “#FraudNewsCNN” आणि “#FNN” या हॅशटॅगसह एक व्हिडिओ शेअर केला आहे. साधारण दोन वर्षांपूर्वीचा हा व्हिडिओ आहे. त्यावेळी ट्रम्प यांनी डब्ल्यूडब्ल्यूई कार्यक्रमात सहभाग घेतला होता. तेव्हा त्यांनी तेथे एका व्यक्तीला मारहाण केली होती. डब्लूडब्लूईच्या रिंगणाबाहेर ट्रम्प "सीएनएन" या वृत्तवाहिनीला मारत असल्याचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेअर करताना मारहाण करणा-या व्यक्तीच्या चेह-यावर एडिटिंगद्वारे सीएनएनचा लोगो लावण्यात आला आहे.
या ट्विटमुळे जगभरात एकच खळबळ उडाली असून ट्रम्प यांच्यावर टीकेचा भडिमार सुरु आहे. मारहाणीचा व्हिडिओ पोस्ट करून ट्रम्प यांनी माध्यमांविरोधात हिंसा भडकवण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप अमेरिकेतील पत्रकारांनी केला आहे.
पाहा व्हिडीओ-
#FraudNewsCNN#FNNpic.twitter.com/WYUnHjjUjg
— Donald J. Trump (@realDonaldTrump) July 2, 2017