प्रकृती बरी नव्हती; पण आता सुधारणा- डोनाल्ड ट्रम्प
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2020 12:56 AM2020-10-05T00:56:45+5:302020-10-05T00:57:07+5:30
ट्रम्प यांच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण शुक्रवारी कमी झाले होते. त्यामुळे त्यांना ऑक्सिजन देण्यात आला.
खरी कसोटी तर लवकरच
वॉशिंग्टन : कोरोनाची बाधा झाल्याचे निदान झाल्यानंतर लष्करी रुग्णालयात भरती केले, त्यावेळी माझी तब्येत बिघडलेली होती; पण आता उपचार सुरू झाल्यानंतर प्रकृतीत सुधारणा झाली आहे, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले. खरी कसोटी तर लवकरच आहे, असे त्यांनी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचा उल्लेख न करता म्हटले आहे.
ट्रम्प यांनी शनिवारी जारी केलेल्या व्हिडिओत हा दावा केला. व्हाईट हाऊसधील ट्रम्प यांचे डॉक्टर सीन कॉन्ली यांनी सांगितले की, ‘‘डोनाल्ड ट्रम्प यांच्या अंगात ताप नसून त्यांना ऑक्सिजनही देता आलेला नाही. त्यांनी शनिवारी दुपारी काही काम केले.’’
ट्रम्प यांच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण शुक्रवारी कमी झाले होते. त्यामुळे त्यांना ऑक्सिजन देण्यात आला. त्यांना व्हाईट हाऊसमधून बेथेसडा येथील वॉल्टर रिड लष्करी वैद्यकीय रुग्णालयात हलविण्यात आले होते. ट्रम्प आजारी असल्याने राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचा प्रचार थंडावू नये म्हणून आॅपरेशन मॅगा ही मोहीम राबविण्यात आली आहे.