Donald Trump : "देव माझ्यासोबत होता, म्हणूनच मी तुमच्यासमोर उभा आहे"; हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 10:16 AM2024-07-19T10:16:29+5:302024-07-19T10:24:36+5:30

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर प्रथमच जनतेला संबोधित केलं. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीत आपण शानदार विजय मिळवू, असंही ते म्हणाले.

Donald Trump first speech after attack says god was on my side during assassination attempt | Donald Trump : "देव माझ्यासोबत होता, म्हणूनच मी तुमच्यासमोर उभा आहे"; हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...

Donald Trump : "देव माझ्यासोबत होता, म्हणूनच मी तुमच्यासमोर उभा आहे"; हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर प्रथमच जनतेला संबोधित केलं. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीत आपण शानदार विजय मिळवू, असंही ते म्हणाले. ट्रम्प यांनी गुरुवारी विस्कॉन्सिनच्या मिलवोकीमध्ये रिपब्लिकन नॅशनल कन्वेन्शनमध्ये भाग घेतला. ट्रम्प यांनी अधिकृतपणे रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवारी स्वीकारली. यावेळी त्यांनी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यावरही जोरदार निशाणा साधला.

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, "आजपासून चार महिन्यांनंतर आपल्याला मोठा विजय मिळेल." त्यांनी वचन दिलं की ते केवळ अर्ध्या देशासाठी नव्हे तर संपूर्ण अमेरिकेसाठी राष्ट्राध्यक्ष असतील. त्यांच्यावरील हल्ल्याचा संदर्भ देत ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली. रक्त वाहत होतं, पण कुठेतरी मला सुरक्षित वाटत होतं कारण देव माझ्यासोबत होता असं सांगितलं. 
.
"मी जर शेवटच्या क्षणी मान हलवली नसती, तर गोळी निशाण्यावरच लागली असती आणि आज रात्री मी तुमच्यासोबत नसतो. सर्वशक्तिमान देवाच्या कृपेने मी तुमच्यासमोर उभा आहे. अनेक लोक म्हणतात की, तो एक महत्त्वपूर्ण  क्षण होता. आम्ही या आठवड्याच्या परिषदेत दैवी हस्तक्षेपाविषयी ऐकले, जेव्हा स्पीकर्सनी गोळीबारावर चर्चा केली. मी येथेही अशाच विषयावर चर्चा करत आहे."

"मी अर्ध्या अमेरिकेचा नव्हे तर संपूर्ण अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होण्याच्या रेसमध्ये आहे, कारण अर्धी अमेरिका जिंकण्यात कोणताच विजय नाही" असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. त्यांनी सीक्रेट सर्व्हिस एजंट्सचे आभार मानले. अद्भुत लोक असं म्हणत एजंट्सचे वर्णन केलं आहे. तसेच त्यांनी मोठा धोका पत्करला आणि जीव वाचवल्याचं देखील सांगितलं. 
 

Web Title: Donald Trump first speech after attack says god was on my side during assassination attempt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.