'ती' पेटिंग बघून डोनाल्ड ट्रम्प यांना आला राग, व्लादिमीर पुतीन यांनी पाठवले खास गिफ्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 20:21 IST2025-03-25T20:20:20+5:302025-03-25T20:21:23+5:30
Donald Trump News: स्वतःचे पेटिंग बघून डोनाल्ड ट्रम्प यांना खूपच राग आला होता. पेटिंग बघून चिडलेल्या ट्रम्प यांना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी एक गिफ्ट पाठवलं आहे.

'ती' पेटिंग बघून डोनाल्ड ट्रम्प यांना आला राग, व्लादिमीर पुतीन यांनी पाठवले खास गिफ्ट
Donald Trump News: काही दिवसांपूर्वी एका ठिकाणी स्वतःची वाईट पेटिंग बघून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना राग अनावर झाला होता. पण, आता एक माहिती समोर आली असून, डोनाल्ड ट्रम्प यांना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांनी एक खास गिफ्ट पाठवले आहे. हे गिफ्ट सुंदर पेटिंग आहे. या पेटिंगचा फोटो अद्याप समोर आलेला नाही. पण, रशियाच्या राष्ट्राध्यक्षाचे कार्यालय असलेल्या क्रेमलिनच्या प्रवक्ते दिमित्री पेस्कोव यांनी सांगितले की, हे पुतीन यांच्याकडून ट्रम्प यांच्यासाठी वैयक्तिक भेट आहे. पुतीन यांचे गिफ्ट बघून ट्रम्प खूश झाले आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिनिधी स्टीव्ह विटकॉफ यांनी पुतीन यांच्याकडून भेट देण्यात आलेली ट्रम्प यांची पेटिंग खूप सुंदर असल्याचे सांगितले.
हेही वाचा >> अमेरिकेच्या टेरिफ वॉरशी जुळवून घेण्यासाठी मोदींची मोठी खेळी
विटकॉफ यांनी सांगितले की, 'ट्रम्प यांची ही पेटिंग रशियातील एका मोठ्या कलाकाराने बनवले आहे. हे पेटिंग खूपच सुंदर आहे. हे पेटिंग बघून ट्रम्प खूपच प्रभावित झाले.'
रशिया अमेरिकेतली जवळीक वाढली
पुतीन यांनी ट्रम्प यांना पाठवलेल्या पेटिंगचे आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. जानेवारीमध्ये डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे अध्यक्ष झाले. तेव्हापासून दोन्ही देशातील संबंध सुधरताना दिसत आहे. त्यातच आता पुतीन यांनी पेटिंग पाठवल्याने हे संबंध अधिक दृढ होत असल्याचे म्हटले जात आहे.
विटकॉफ यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटले की, रशियाचे राष्ट्राध्यक्षांचे स्वभाव खूपच चांगला आहे. मी दहा दिवसांपूर्वीच पुतीन यांना भेटलो. गेल्यावर्षी डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करण्याचा प्रयत्न झाला होता, तेव्हा पुतीन यांनी त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली होती, असेही विटकॉफ यानंही म्हटले आहे.