CoronaVirus News : कोरोनानं 90 हजार लोकांचा मृत्यू झाल्यानंतर ट्रम्प म्हणाले, हा तर 'बॅज ऑफ ऑनर'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 03:00 PM2020-05-20T15:00:19+5:302020-05-20T15:11:07+5:30
जगात सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण अमेरिकेत सापडणं हा 'बॅज ऑफ ऑनर' आहे.
वॉशिंग्टनः अमेरिकेत कोरोना विषाणूची एकूण 1,528,566 रुग्णांना बाधा झाली आहे. कोरोनामुळे अमेरिकेत 91,921 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचदरम्यान, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी देशातील कोरोनाच्या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात होत असलेल्या वाढीला अभिमानाची गोष्ट म्हटलं आहे.
theguardian.comच्या अहवालानुसार ट्रम्प म्हणाले की, जगात सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण अमेरिकेत सापडणं हा 'बॅज ऑफ ऑनर' आहे. मला असं वाटतं की, काही प्रमाणात ही चांगली गोष्ट आहे. याचा अर्थ आपली चाचणी करण्याची क्षमता खूप चांगली आहे.
व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प यांनी पत्रकारांना सांगितले की, "तुम्हाला माहिती आहेच की, कोरोना संक्रमितांच्या बाबतीत आम्ही जगात आघाडीवर आहोत, असे आपण म्हणता तेव्हा याचा अर्थ असा होतो की आमच्याकडे इतरांपेक्षा अधिक चांगली टेस्टिंग सुविधा आहे." कोरोना साथीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये पहिल्यांदाच मंत्रिमंडळाची बैठकही घेतली. यापूर्वी कोरोनाबाबत अनेक वादग्रस्त विधानांचा सिलसिला कायम ठेवणारे ट्रम्प म्हणाले, 'आमच्याकडे बरेच रुग्ण सापडत आहे, मला त्यात काही वाईट दिसत नाही. आमची चाचणी करण्याची क्षमता खूप चांगली आहे हे मी ठामपणे सांगू शकतो.
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी असेही म्हटले आहे की, बर्याच व्यावसायिकांनी कोरोनाच्या संकटात चांगलं काम केलं असून, चाचणी करूनही घेतली आहे. अमेरिकेच्या रोग नियंत्रण केंद्राच्या माहितीनुसार मंगळवारपर्यंत अमेरिकेने एक कोटी 26 लाख कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. जगभरात अमेरिकेने नक्कीच सर्वात जास्त चाचण्या घेतल्या आहेत. पण ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या Our World in Dataनुसार 'कॅपिटा बेसिस' वर जगातील पहिले स्थान नाही. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या Our World in Data चार्टमध्ये दर हजार लोकांमागे चाचण्या घेण्यात अमेरिका 16 व्या स्थानावर आहे. आइसलँड, न्यूझीलंड, कॅनडा प्रतिहजार लोकांच्या एकूण चाचणीच्या बाबतीत अमेरिकेपेक्षा पुढे आहेत.
हेही वाचा
Cyclone Amphan : तो येतोय..., चक्रीवादळाची चाहूल लागल्यानं घाबरलंय ओडिशा
CoronaVirus News: डोनाल्ड ट्रम्प घेताहेत हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषध; तज्ज्ञ म्हणतात...
CoronaVirus News : चिंताजनक! कोरोनामुळे जगभरात 6 कोटी लोक गरिबीच्या विळख्यात सापडणार
Coronavirus: अहो आश्चर्यम्! फक्त दोन वेदनाशामक औषधं घेऊन रुग्ण झाले ठणठणीत, प्रशासनही आश्चर्यचकीत
भारत आमची जागा कधीच घेऊ शकत नाही; कंपन्या बाहेर पडल्यामुळे चीन मोदींवर भडकला
CoronaVirus: लसीशिवाय 'या' नव्या औषधानं ठीकठाक होतायत कोरोनाचे रुग्ण; चीनच्या प्रयोगशाळेचा दावा
CoronaVirus : लढ्याला यश! दोन औषधांनी ४ दिवसांत ६० कोरोनाबाधित रुग्ण झाले ठणठणीत