डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दिलासा, हश मनी प्रकरणातील सर्व 34 आरोपांतून निर्दोष मुक्तता
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 21:57 IST2025-01-10T21:56:45+5:302025-01-10T21:57:25+5:30
Donald Trump Hush Money Case: अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दिलासा, हश मनी प्रकरणातील सर्व 34 आरोपांतून निर्दोष मुक्तता
Donald Trump Hush Money Case: अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना हुश मनी प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने त्यांना सर्व 34 आरोपांमधून बिनशर्त निर्दोष मुक्त केले आहे. न्यायालयाने त्यांना दुसऱ्या कार्यकाळासाठी शुभेच्छाही दिल्या. निकाल देताना न्यायाधीश मार्चेन यांनी या प्रकरणात मोठा विरोधाभास असल्याचे म्हणाले.
Hush Money Case: Donald Trump sentenced to 'unconditional discharge', won't face jail time, penalty
— ANI Digital (@ani_digital) January 10, 2025
Read @ANI Story | https://t.co/bpkJhMavkM#DonaldTrump#HushMoneyCase#UnitedStatespic.twitter.com/xO2ysg7bSE
10 दिवसांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेणार
मॅनहॅटन क्रिमिनल कोर्टात शिक्षेच्या सुनावणीदरम्यान डोनाल्ड ट्रम्प व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर झाले. या प्रकरणात ट्रम्प दोषी आढळले असले तरी त्यांना कोणतीही शिक्षा झालेली नाही. विशेष म्हणजे 10 दिवसांनंतर ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर काय आरोप होते?
2016 मध्ये ट्रम्प यांच्यावर स्कँडलपासून वाचण्यासाठी एका अडल्ट स्टारला 1 लाख 30 हजार डॉलर्स दिल्याचा आरोप होता. आपल्या नात्याबाबत मौन बाळगण्यासाठी ट्रम्प यांनी अडल्ट स्टारला पैसे दिल्याचा आरोप होता. गेल्या वर्षी मे महिन्यात ट्रम्प यांना दोषी ठरवण्यात आले होते. आता आज अखेर त्यांना या आरोपातून मुक्त करण्यात आले.