युद्धाचे ढग! इराणच्या जहाजांनी त्रास दिल्यास ती उडवून द्या; डोनाल्ड ट्रम्प यांचे अमेरिकेच्या नौदलाला आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 07:50 PM2020-04-22T19:50:14+5:302020-04-22T20:09:39+5:30

इराणच्या नौदलानं समुद्रात आपल्या जहाजांना त्रास दिल्यास सर्व इराणी गनबोटांना उडवून द्या, अशी सूचना डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या नौदलाला केली आहे.

donald trump instructed navy to shoot down all iran gunboats if they harass our ships vrd | युद्धाचे ढग! इराणच्या जहाजांनी त्रास दिल्यास ती उडवून द्या; डोनाल्ड ट्रम्प यांचे अमेरिकेच्या नौदलाला आदेश

युद्धाचे ढग! इराणच्या जहाजांनी त्रास दिल्यास ती उडवून द्या; डोनाल्ड ट्रम्प यांचे अमेरिकेच्या नौदलाला आदेश

googlenewsNext

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापार युद्धावरून चीनला इशारा दिलेला असतानाच आता आपल्या नौदलाला इराणची बोट पाहिल्यास ती उडवून देण्यास सांगितले आहे. ट्विट करत त्यांनी या आदेशाची माहिती दिली आहे. ट्रम्प म्हणाले की, इराणच्या नौदलानं समुद्रात आपल्या जहाजांना त्रास दिल्यास सर्व इराणी गनबोटांना उडवून द्या, अशी सूचना डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या नौदलाला केली आहे.

विशेष म्हणजे 3 जानेवारी 2020 रोजी अमेरिकेने हवाई हल्ल्यात इराणचे जनरल कासिम सुलेमानी यांना ठार केले होते. त्यानंतर इराण आणि अमेरिकेत तणाव वाढला आहे. दोन्ही देश एकमेकांचे शत्रू बनले आहेत. अमेरिकेच्या या पावलानंतर इराणनेही अमेरिकन तळांवर क्षेपणास्त्रांनी हल्ला केला होता आणि त्यात 80 लोक ठार झाल्याचा दावा केला होता. त्यानंतर अमेरिकेने सांगितले की, सर्व काही सुरक्षित आहे आणि कोणतेही मोठे नुकसान झालेले नाही.


गेल्या काही दिवसांपूर्वी इराकमधील अमेरिकी दूतावासाजवळ रॉकेट हल्ला झाल्याची घटना समोर आली होती. अमेरिकी दूतावासाजवळ पाच रॉकेट डागल्याची माहिती समोर आली होती. तसेच इराणने हा हल्ला केल्याचं म्हटलं जात होतं. सुलेमानींच्या हत्येनंतरही इराणने अशीच कारवाई केली होती. इराणने इराकमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ला केला होता. अमेरिकेने या हल्ल्यात कोणतीही हानी झाली नसल्याचं म्हटलं होतं, मात्र त्यानंतर 34 सैनिक जखमी झाल्याचं मान्य केलं होतं. इराकमधील अमेरिकी दूतावासाजवळ दोन रॉकेट डागण्यात आले होते. यात कोणी जखमी झालं नव्हतं, पण इराण आणि अमेरिकेत तणाव वाढला होता. इराणी सैन्याने काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या इराकमधील बलाद येथे असलेल्या तळांवर रॉकेट हल्ला केला होता. इराणकडून अमेरिकेच्या या तळावर एकूण 8 रॉकेट डागण्यात आली. यामध्ये चार जण जखमी झाले होते. जखमींमध्ये दोन एअरमॅन आणि दोन इराकी अधिकाऱ्यांचा समावेश होता. या हल्ल्याची कुठलाही गट किंवा संघटनेने जबाबदारी घेतलेली नव्हती. मात्र हा हल्ला इराकमधील इराणचा पाठिंबा असलेल्या गटाने केल्याचा आरोप अमेरिकेकडून करण्यात आला होता. 

Web Title: donald trump instructed navy to shoot down all iran gunboats if they harass our ships vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.