ट्रम्प जिंको अथवा हॅरीस...; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला किती मिळणार सॅलरी? सोबतच या खास सुख-सुविधाही मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 04:41 PM2024-11-05T16:41:03+5:302024-11-05T16:42:15+5:30

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची गणना जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्तींमध्ये होते. मात्र, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना किती सॅलरी मिळते आणि कोणत्या सुख-सुविधा मिळतात हे आपल्याला माहीत आहे का?

Donald Trump Kamala Harris How much salary will the President of the United States get Along with these special comforts will also be available | ट्रम्प जिंको अथवा हॅरीस...; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला किती मिळणार सॅलरी? सोबतच या खास सुख-सुविधाही मिळणार

ट्रम्प जिंको अथवा हॅरीस...; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला किती मिळणार सॅलरी? सोबतच या खास सुख-सुविधाही मिळणार

अमेरिकेत 5 नोव्हेंबरपासून राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होत आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची गणना जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्तींमध्ये होते. मात्र, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना किती सॅलरी मिळते आणि कोणत्या सुख-सुविधा मिळतात हे आपल्याला माहीत आहे का? तर जाणून घेऊयात...

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना किती सॅलरी मिळते? -
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना दरवर्षी 4 लाख डॉलर्स एवढी सॅलरी मिळते. रुपयांत बोलायचे झाल्यास जवळपास 3.36 कोटी रुपये. याशिवाय, त्यांन अतिरिक्त खर्चासाठी 50 हजार डॉलर (सुमारे 42 लाख रुपये) देखील मिळतात. यूएस प्रशासनाच्या अहवालानुसार, राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर जो कुणी अधिकृत निवासस्थान म्हणून व्हाईट हाऊसमध्ये येतो तेव्हा त्याला एकरकमी 100000 डॉलर्स अर्थात 84 लाख रुपये दिले जातात. या रकमेतून ते आपल्या आवडीनुसार घर आणि कार्यालयाची रंग-रंगोटी अथवा साज-सजावट करू शकतात.

आणखी कोण कोणत्या सुविधा मिळतात -
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वॉशिंग्टन डीसीमधील व्हाईट हाऊसमध्ये राहतात. त्यांचे कार्यालयही येथेच आहे. 18 एकर एवढ्या मोठ्या पसरिसरात असलेल्या या आलिशान व्हाईट हाऊसमध्ये राहण्यासाठी राष्ट्राध्यक्षांना कुठल्याही प्रकारचे शुल्क द्यावे लागत नाही. बीबीसीच्या वृत्तानुसार, अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना मनोरंजन, कर्मचारी आणि स्वयंपाकासाठी दरवर्षी 19000 डॉलर मिळथात. याशिवाय, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना मोफत आरोग्य सेवाही मिळते.

सर्वात 'तगडी' सुरक्षा व्यवस्था -
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष अशा लोकांपैकी आहेत ज्यांना सर्वात मजबूत सुरक्षा मिळते. त्याच्या सुरक्षेत सीक्रेट सर्व्हिस एजंट्ससह, एफबीआय आणि मरीनचाही समावेस आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष एअर फोर्स वन विमानाने प्रवास करतात. हे जगातील सर्वात सुरक्षित आणि आधुनिक विमान असल्याचे म्हटले जाते. एअर फोर्स वनमध्ये सुमारे 4000 स्क्वेअर फूट एवढी जागा आहे. यात राष्ट्राध्यक्षांना कार्यालय, सचिवालय, मिटिंग रूम आणि बेड रूमचाही सममावेश आहे. महत्वाचे म्हणजे या विमानात त्यांच्यासोबत  विमानात त्याच्यासोबत सुमारे 100 लोक प्रवास करू शकतात. याशिवाय, अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या ताफ्यात लिमोझिन कार आणि मरीन हेलिकॉप्टरचाही समावेश आहे. या बुलेटप्रूफ वाहनांमध्ये क्षेपणास्त्र यंत्रणेपासून ते आधुनिक कम्युनिकेशन सिस्टिमपर्यंतची सुरविधा आहे.

अमेरिकेच्या पहिल्या राष्ट्राध्यक्षांनी किती सॅलरी मिळायची? -
अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांना वार्षाला 2000 डॉलर एवढी सॅलरी मिळत होती. 235 वर्षांपूर्वी ही एक मोठी रक्कम होती. अमेरिकेतील अनेक राष्ट्राध्यक्षांनी, जसे की, डोनाल्ड ट्रम्प, जॉन एफ केनेडी आणि हर्बर्ट हूवर तर आपली वार्षिक सॅलरी गरजू आणि धर्मादाय संस्थांना दान करत होते.

Web Title: Donald Trump Kamala Harris How much salary will the President of the United States get Along with these special comforts will also be available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.