कोरोना संसर्गानंतर डोनाल्ड ट्रम्प हॉस्पिटलबाहेर; नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तज्ज्ञांची टीका
By ravalnath.patil | Published: October 5, 2020 11:00 AM2020-10-05T11:00:49+5:302020-10-05T11:02:30+5:30
Donald Trump : सार्वजनिक आरोग्य मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन आणि साथीच्या आजारांवर चुकीची माहिती पसरवण्याबद्दल अनेकदा डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका करण्यात आली आहे.
वॉशिंग्टनः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोरोनावरील उपचारांसाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मात्र, कोरोनावर उपचार सुरु असताना रविवारी ते काहीकाळ हॉस्पिटलमधून बाहेर गेले. बाहेर जाताना डोनाल्ड ट्रम्प यांनी हॉस्पिटलसमोर उभे असलेल्या समर्थकांना अभिवादन केले. दरम्यान, कोरोनाशी संबंधित प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याप्रकरणी वैद्यकीय समुदायाने त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
वॉशिंग्टनजवळील वॉल्टर रीड मिलिटरी हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी बाहेर पडताना मास्क लावला होता. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या बुलेटप्रूफ कारमधून हॉस्पिटलच्या बाहेरील समर्थकांना अभिवादन केले. डोनाल्ड ट्रम्प यांनी हॉस्पिटलमधून बाहेर पडण्यापूर्वी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला. व्हिडिओमध्ये ते म्हणाले, 'खऱ्या शाळेत जाऊन कोरोनाबाबत बरेच काही शिकायला मिळाले.' दरम्यान, सार्वजनिक आरोग्य मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन आणि साथीच्या आजारांवर चुकीची माहिती पसरवण्याबद्दल अनेकदा डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका करण्यात आली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्याच सरकारने सार्वजनिक आरोग्यासंदर्भात दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केले आहे, असे अशी तक्रार तज्ज्ञांनी केली आहे. या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कोरोना रुग्णांना उपचारादरम्यान आयसोलेशनमध्ये राहण्याची गरज आहे. तसेच, त्यांनी सुरक्षेत तैनात असलेल्या जवानांच्या जीवालाही धोका पोहचविण्याची शक्यता आहे, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
#UPDATES President Trump waves to supporters from a motorcade on a short drive outside his hospital shortly after he had announces "a surprise" for fans, apparently designed to personally take back the narrative on his health https://t.co/dJdyigF8OQpic.twitter.com/QTr5lcmgH9
— AFP news agency (@AFP) October 5, 2020
अमेरिकेच्या आरोग्य तज्ज्ञांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या या 'स्टंट'वर टीका केली आहे. राष्ट्राध्यक्षांच्या अनिवार्य प्रवासामुळे कारमधील प्रत्येक व्यक्तीला १४ दिवसांसाठी क्वारंटाइन करणे आवश्यक आहे, जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या आपत्ती औषध विभागाचे प्रमुख जेम्स फिलिप्स म्हणाले. तसेच, त्यांच्यासोबत असलेले व्यक्ती आजारी पडू शकतील. कदाचित त्यांचा मृत्यू होऊ शकेल. राजकीय फायद्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचे जीवन धोक्यात घातले. हा वेडेपणा आहे, असेही जेम्स फिलिप्स यांनी सांगितले.