कोरोना, हाँगकाँगवरून चीनविरोधात अमेरिकेची आरपारची तयारी, ट्रम्प आठवडाभरात घेणार मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 11:00 AM2020-05-27T11:00:38+5:302020-05-27T11:56:39+5:30
कोरोनाचे संकट असतानाच आता चीनने हाँगकाँगवर आपले वर्चस्व दाखवण्यासाठी नवा कायदा आणल्याने अमेरिकेने चीनविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
वॉशिंग्टन - कोरोना विषाणूबाबत जगाला बरेच दिवस अंधारात ठेवल्याने सध्या चीनला जगातील अनेक देशांकडून टीकेचे लक्ष्य केले जात आहे. दरम्यान, कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेली अमेरिकाहीचीनविरोधात आक्रमक झाली आहे. एकीकडे कोरोनाचे संकट असतानाच आता चीनने हाँगकाँगवर आपले वर्चस्व दाखवण्यासाठी नवा कायदा आणल्याने अमेरिकेने चीनविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. चीनने हाँगकाँगमध्ये जे काही सुरू केले आहे ते योग्य नाही आम्ही याविरोधात लवकरच योग्य तो निर्णय घेणार आहोत, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.
व्हाइट हाऊसमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ट्रम्प म्हणाले की, ‘’हाँगकाँगमध्ये चीन जे काही करत आहे ते योग्य नाही आहे. आम्ही लवकरच यावर योग्य तो निर्णय घेऊ. तुम्हाला याबाबतची माहिती लवकरच मिळेल, कदाचित याच आठवड्यात. आम्ही चीनला जोरदार उत्तर देऊ.’’
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प कोरोना विषाणू आणि अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडीवरून आधीच चीनवर संतप्त झालेले आहेत. अमेरिकेत पसरलेल्या कोरोना विषाणूसाठी ट्रम्प यांनी चीनला जबाबदार धरले आहे. तसेच निवडणुकीत आपल्याला पराभूत करण्यासाठीची ही चीनची चाल असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
दरम्यान, सध्या चीनमध्ये कम्युनिस्ट पक्षाची संसद सुरू आहे. या संसदेत चीनसंदर्भात मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच यादरम्यान, हाँगकाँगमध्ये लागू करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय संरक्षण कायद्याबाबतही चर्चा झाली आहे. तसेच हा कायदा या महिना अखेरीस लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. गेल्यावर्षीच हाँगकाँगमध्ये या कायद्याविरोधात मोठे आंदोलन झाले होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या
शास्त्रज्ञांनी लावला कोरोना विषाणूला निष्क्रीय करणाऱ्या जीवाणूंचा शोध
गरज पडल्यास आमचे सैन्य लढण्यास तयार, नेपाळच्या संरक्षणमंत्र्यांची भारताला धमकी
लॉकडाऊन न करताच या मोठ्या देशाने कोरोनाला दिली मात, नागरिकांची ही सवय ठरली उपयुक्त
कोरोनामुळे निर्माण झालेल्या तणावादरम्यान अमेरिकेचा चीनला तगडा धक्का, केली मोठी कारवाई
लॉकडाऊन आणि मंदीचे सावट असतानाही ही कंपनी करणार ५० हजार कर्मचाऱ्यांची मेगाभरती
हाँगकाँगमधील कुठल्याही व्यक्तीने चीनमध्ये कुठलाही अपराधे केल्यास तपासासाठी त्याचे प्रत्यार्पण करण्याची तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे. यापूर्वी या कायद्यात ही तरतूद नव्हती. याशिवाय जर कुठल्याही व्यक्तीने राष्ट्रीय प्रतीकांसोबत छेडछाड केली किंवा एखाद्या व्यक्तीचे कुठलेही कृत्य प्रशासनाला राष्ट्रविरोधी वाटले तर त्लाया तीन वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकेल. मात्र हाँगकाँगने हा कायदा लोकशाहीविरोधी असल्याचे म्हटले आहे.