डोनाल्ड ट्रम्प यांना अटक होणार? स्वत:च अटकेचा दिवस सांगितला अन् कार्यकर्त्यांना आदेशही दिला!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 09:17 PM2023-03-18T21:17:44+5:302023-03-18T21:18:55+5:30

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. ट्रम्प यांनी शनिवारी सोशल मीडिया पोस्टमध्ये याची माहिती दिली असून त्यांनी स्वत:च आपल्याला अटक होऊ शकते असं म्हटलं आहे.

donald trump says he expects to be arrested on tuesday calls for protests | डोनाल्ड ट्रम्प यांना अटक होणार? स्वत:च अटकेचा दिवस सांगितला अन् कार्यकर्त्यांना आदेशही दिला!

डोनाल्ड ट्रम्प यांना अटक होणार? स्वत:च अटकेचा दिवस सांगितला अन् कार्यकर्त्यांना आदेशही दिला!

googlenewsNext

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. ट्रम्प यांनी शनिवारी सोशल मीडिया पोस्टमध्ये याची माहिती दिली असून त्यांनी स्वत:च आपल्याला अटक होऊ शकते असं म्हटलं आहे. यासोबतच त्यांनी आपल्या समर्थकांना याचा विरोध करण्याचेही आदेश दिले आहेत. ट्रम्प म्हणाले की त्यांना मॅनहॅटन येथील अटॉर्नीच्या ऑफीसमधून मिळालेल्या गुप्त सुचनेनुसार त्यांना अटक केली जाऊ शकते. पण त्यांच्यावर नेमका आरोप काय आहे हे त्यांनी सांगितलेलं नाही. याप्रकरणी अटॉर्नी कार्यालयाच्या प्रवक्त्यांनी कोणतंही भाष्य करण्यास टाळलं आहे. 

न्यूयॉर्कमधील अधिकारी काही महिलांना दिलेल्या पैशांशी संबंधित प्रकरणाची चौकशी करत आहेत. याच प्रकरणात ट्रम्प यांना अटक केली जाऊ शकते. महिलांना शारीरिक संबंधांच्या बदल्यात पैसे देऊन हे प्रकरण सार्वजनिक करू नका, असे सांगितल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

ट्रम्प यांनी शनिवारी ट्रूथ या सोशल मीडिया साइटवर एक पोस्ट केली. यात मॅनहॅटन जिल्हा अटॉर्नी कार्यालयातील गुप्त सुचनेद्वारे मिळालेल्या माहितीनुसार रिपब्लिकन उमेदवार आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष पुढच्या आठवड्यात मंगळवारी अटक केली जाऊ शकते असं म्हटलं आहे. 

ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना याविरोधात निदर्शनं करण्याचं आवाहन केलं आहे. न्यूयॉर्कमध्ये कायदे अधिकाऱ्यांनी गोंधळाच्या शक्यतेबाबत सुरक्षेची व्यवस्था केली आहे. 

Web Title: donald trump says he expects to be arrested on tuesday calls for protests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.