डोनाल्ड ट्रम्प म्हणतात, ‘कोण पुतिन, ओळखत नाही' !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2017 04:31 PM2017-02-08T16:31:13+5:302017-02-08T16:51:58+5:30
रशियाबाबत अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे मवाळ आहेत अशी टीका होत आहे.या पार्श्वभूमीवर मंगळवारी ट्रम्प यांनी ‘मी पुतीन यांना ओळखत नाही’असं
Next
ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 8 - रशियाबाबत अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे मवाळ आहेत अशी त्यांच्यावर सातत्याने टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी ट्रम्प यांनी ‘मी पुतिन यांना ओळखत नाही’असं उपहासात्मक ट्वीट केलं आहे.
‘कोण पुतिन मी त्यांना ओळखत नाही’रशियाशी कोणताही समझोता नाहीये, तिरस्कार करणारे वेडेपणा दाखवताएत, तरी ओबामा दहशतवादात एक नंबर असलेल्या इराणशी करार करू शकतात. काही अडचण नाही असं ट्वीट त्यांनी केलं आहे.
दहशतवादी संघटना आयसिसविरोधात लढण्यासाठी रशिया आणि पुतिन यांच्याबरोबर काम करण्याची ट्रम्प यांची इच्छा आहे. त्यामुळे विरोधी पक्षांकडून ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला जात आहे. तर काही दिवसांपूर्वी फॉक्स न्यूजच्या एंकरने ट्रम्प हे पुतीन यांचा सन्मान करतात का? असा प्रश्न विचारला होता त्यावर ट्रम्प यांनी हो उत्तर दिलं असता पुतिन हे खूनी आहेत, तरी ट्रम्प त्यांचा इतका सन्मान का करतात असा प्रश्न राइली यांनी विचारला. त्यावर ट्रम्प यांनी आपल्याकडेही (अमेरिका) बरेच खूनी आहेत, तुम्हाला काय वाटतं आपला देश खूप निर्दोष आहे का असं उत्तर ट्रम्प यांनी दिलं होतं. तेव्हापासून ट्रम्प यांच्यावर टीका वाढली आहे.
I don't know Putin, have no deals in Russia, and the haters are going crazy - yet Obama can make a deal with Iran, #1 in terror, no problem!
— Donald J. Trump (@realDonaldTrump) February 7, 2017