"माझा मुलगा 15 मिनिटांत झाला कोरोनामुक्त"; डोनाल्ड ट्रम्प यांचा अजब दावा
By सायली शिर्के | Published: October 28, 2020 08:34 AM2020-10-28T08:34:32+5:302020-10-28T08:46:46+5:30
Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक अजब दावा केला आहे. "माझा मुलगा 15 मिनिटांत कोरोनामुक्त झाला" असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
पेंसिलवेनिया - जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येने तब्बल चार कोटींचा टप्पा पार केला असून लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेसारखा प्रगत देशही कोरोना पुढे हतबल झाला आहे. अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांची आणि मृतांची संख्या ही सर्वाधिक आहे. एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यातून बरं होण्यासाठी साधारण एक आठवडा अथवा दहा दिवस लागतात. मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याच दरम्यान एक अजब दावा केला आहे. "माझा मुलगा 15 मिनिटांत कोरोनामुक्त झाला" असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी यांनी आपला मुलगा बॅरोन 15 मिनिटांतच कोरोनामुक्त झाला असा दावा केला आहे. पेंसिलवेनियाच्या मार्टिन्सबर्गमध्ये एका निवडणूक रॅलीत आपल्या समर्थकांशी संवाद साधताना त्यांनी मुलाला झालेल्या कोरोनाबाबत माहिती दिली. काही दिवसांपूर्वी मेलानिया ट्रम्प आणि त्यांचा मुलगा बॅरोन ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाली होती. व्हिस्कॉन्सिनमध्ये झालेल्या रॅलीतही ट्रम्प यांनी आपल्या मुलाच्या मजबूत रोगप्रतिकारक शक्तीचा उल्लेख केला. त्याच्या रोगप्रतिकारक शक्तीमुळे 15 मिनिटांत तो कोरोनामुक्त झाला. त्यानंतर त्याने आपल्यासमोर शाळेत जायची इच्छाही व्यक्त केल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
"माझा मुलगा 15 मिनिटांत कोरोनामुक्त झाला"
"बेरॉनच्या कोरोना टेस्टबाबत मी डॉक्टरांना विचारलं तेव्हा त्यांनी मला त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं सांगितलं. 15 मिनिटांनी पुन्हा त्याच्या तब्येतीबाबत विचारलं तेव्हा डॉक्टरांनी तो कोरोनामुक्त झाल्याचं सांगितलं" असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. ट्रम्प यांना अमेरिकेतील शाळा सुरू करायच्या आहेत. मात्र अनेक राज्य त्यांच्या या निर्णयाशी सहमत नाही. मुलांच्या आरोग्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे ट्रम्प निवडणूक रॅलीतून शाळा सुरू करण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि निवडणूक रॅलीत आपल्या मुलाचं उदाहरण देत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबते वृत्त दिले आहे.
ट्रम्प यांच्या पोस्टवर ट्विटर आणि फेसबुक या दोघांनीही घेतली Actionhttps://t.co/9SLYGakz0W#DonaldTrump#Facebook#Twitter#America#coronavirus
— Lokmat (@MiLOKMAT) October 7, 2020
मास्क लावणारे नेहमीच असतात कोरोनाग्रस्त, डोनाल्ड ट्रम्प यांचं वादग्रस्त विधान
ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी "मास्क लावणारे लोक नेहमीच कोरोनाग्रस्त असतात" असं वादग्रस्त विधान डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं होतं. मियामी या ठिकाणी एनबीसी न्यूजचा एक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात ट्रम्प यांनी हा दावा केला होता. 26 सप्टेंबरला व्हाइट हाऊसमध्ये एक कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमात आलेल्या लोकांमुळे ट्रम्प यांना कोरोना झाल्याचं म्हटलं जातं आहे. या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या बहुतांश लोकांनी मास्क लावले नव्हते. त्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर आता नेहमी मास्क घालणारे लोक कोरोनाग्रस्त असतात असं ट्रम्प यांनी म्हटलं होतं.
"भारत विषारी हवा सोडणारा देश", डोनाल्ड ट्रम्प यांचं टीकास्त्र
ट्रम्प यांनी अध्यक्षीय वादविवादात पर्यावरण बदल आणि कार्बन उत्सर्जनाच्या मुद्यावर आपल्या धोरणांचा बचाव करण्यासाठी भारत, चीन आणि रशियावर निशाणा साधला होता. 'अमेरिका हा सर्वात कमी कार्बन उत्सर्जन करतो. त्या उलट चीन, भारत आणि रशिया आपल्या देशातील हवेच्या स्तराचा विचार करत नाही. या तीन देशांतील हवेचा स्तर अतिशय वाईट आहे' असं म्हणत हे देश प्रदूषणाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी हवामान बदलाबाबत घेतलेल्या भूमिकेवर यापूर्वीही टीका करण्यात आली आहे.
भारत, रशिया आणि चीनवर साधला निशाणा, म्हणाले...https://t.co/B8NiR1sfWz#DonaldTrump#America#Indiapic.twitter.com/Oy9jy3ah70
— Lokmat (@MiLOKMAT) October 23, 2020