'संपूर्ण जगावर टॅरिफ लादणार; काय होईल, ते पाहू...', डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 19:04 IST2025-03-31T19:04:23+5:302025-03-31T19:04:58+5:30
Donald Trump Tariff Threats: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे जगभरातील व्यापारावर परिणाम होणार आहे.

'संपूर्ण जगावर टॅरिफ लादणार; काय होईल, ते पाहू...', डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याने खळबळ
Donald Trump On Tarrif:डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद स्वीकारल्यानंतर एकापाठोपाठ एक मोठे निर्णय घेत आहेत. यातील सर्वात मोठा निर्णय म्हणजे परस्पर शुल्काचा(टॅरिफ). ट्रम्प यांनी भारतासह अनेक देशांवर ज्यादा शुल्क लादण्याचा इशारा काही दिवसांपूर्वीच दिला होता. आता तर त्यांनी संपूर्ण जगावरच शुल्क लादण्याची घोषणा केली आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी, येत्या काही दिवसांत सर्व देशांवर शुल्क लागू करणार असल्याचे सांगितले.
Trump's team is considering global tariffs of up to 20% that would 'hit virtually all U.S. trading partners' 😂😂😂
— Olala🇻🇳 🇨🇳 🇷🇺 (@olalatech1) March 31, 2025
They are forcing the local currency to depreciate against the dollar. pic.twitter.com/XI0EAxGYxW
आत्तापर्यंत जे देश अमेरिकन वस्तू आणि सेवांवर शुल्क लावतात किंवा ज्या देशांशी अमेरिकेचा व्यापार असंतुलित आहे, अशा देशांवर शुल्क लादण्याची घोषणा ट्रम्प यांनी केली होती. पण, आता त्यांनी संपूर्ण जगावर शुल्क लादण्याचे विधान करुन सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, अनेक देशांनी आम्हची विविध प्रकारे फिसवणूक केली. इतिहासात कधीही कोणत्याही देशाने अशी फसवणूक केली नसेल. पण, आम्ही नेहमी त्यांना खूप चांगली वागणूक दिली. आता आम्ही सर्व देशांवर शुल्क लादणार. जे होईल, ते पाहू...असा अशारा ट्रम्प यांनी दिला आहे.
आधी काय अंदाज लावला जात होता?
डोनाल्ड ट्रम्प यांनी येत्या 2 एप्रिल 2025 पासून शुल्क लादण्याचा इशारा दिला आहे. आधी अशी अटकळ लावली जात होती की, अमेरिकेच्या परस्पर शुल्क धोरणाचा निवडक 10-15 देशांवर परिणाम पडेल. पण, आता डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्व देशांवर शुल्क लादण्याची भाषा केल्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. पण, डोनाल्ड ट्रम्प शेवटच्या क्षणी त्यांचा निर्णय मागे घेतील, असा अंदाजही लावला जातोय. आता ट्रम्प काय निर्णय घेणार, हे येत्या काही दिवसांत कळेलच.