‘शुल्कामुळे आर्थिक व्यापार युद्ध सुरू होईल’, समर्थकानेच डोनाल्ड ट्रम्प यांचे कान टोचले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 19:18 IST2025-04-07T19:18:17+5:302025-04-07T19:18:51+5:30
Donald Trump Tariff War: अब्जाधीश फंड मॅनेजर आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थक बिल ऍकमन यांनी व्यापार युद्धाचा गंभीर धोका अधोरेखित केला.

‘शुल्कामुळे आर्थिक व्यापार युद्ध सुरू होईल’, समर्थकानेच डोनाल्ड ट्रम्प यांचे कान टोचले
Bill Ackman Warns Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्वच देशांवर टॅरिफ लादल्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे जागतिक मंदीची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे, ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे इतर देशांसह अमेरिकन उद्योगपतीही घाबरले आहेत. त्यांच्या समर्थकांचाही आता संयम सुटला असून, त्यांनी हा आर्थिक वेडेपणा थांबवण्याचे आवाहन केले आहे.
अब्जाधीश फंड मॅनेजर आणि ट्रम्प यांचे समर्थक बिल ऍकमन यांनी तर एकाच वेळी सर्व देशांवर भारी शुल्क लादणे म्हणजे आर्थिक युद्ध छेडण्यासारखे असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. ॲकमन यांनी ट्विटरवरील पोस्टमध्ये म्हटले की, अमेरिकेचे प्रमुख दिग्गज उद्योगपतींचा विश्वास गमावत आहेत, त्यांनी हे व्यापार युद्ध थांबवले पाहिजे. राष्ट्राध्यक्षांना वाटाघाटीद्वारे व्यापार समस्या सोडवण्याची 90-दिवसांची संधी आहे, असेही आहे.
'आर्थिक आण्विक युद्ध सुरू झाले तर...'
ते पुढे म्हणाले, दुसरीकडे आपण जगातील प्रत्येक देशावर आर्थिक अणुयुद्ध छेडले, तर व्यवसायातीलगुंतवणूक गोठवली जाईल, ग्राहकांची पाकीट आणि बचत खाती गोठवली जातील आणि जगभरात आपली प्रतिष्ठा खराब होईल. ही प्रतिष्ठा परत मिळवण्यासाठी अनेक वर्षे आणि कदाचित दशके लागतील. ट्रम्प यांनी शुल्काला जागतिक मुद्दा बनवून योग्य पाऊल उचलले होते, परंतु आता याने धोकादायक वळण घेतले आहे. हे थांबले पाहिजे, अन्यथा देश विनाशाकडे जाईल.