डोनाल्ड ट्रम्प यांची पक्षत्यागाची धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2015 11:27 PM2015-12-09T23:27:02+5:302015-12-09T23:27:02+5:30
वादग्रस्त विधान करून रोष ओढवून घेणारे रोनाल्ड ट्रम्प यांनी रिपब्लिकन पार्टी सोडण्याची धमकी दिली आहे.
वॉशिंग्टन : वादग्रस्त विधान करून रोष ओढवून घेणारे रोनाल्ड ट्रम्प यांनी रिपब्लिकन पार्टी सोडण्याची धमकी दिली आहे. अमेरिकी अध्यक्षपदाची निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढविली तरी ७० टक्के समर्थक आपल्या बाजूने मते टाकतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
मुस्लिमांना अमेरिकेत प्रवेश बंदी करावी, असे विधान रोनाल्ड ट्रम्प यांनी केले होते. त्यांच्या या विधानावर जगभरातून टीकेचे झोड उठत आहे. तथापि, ते आपल्या विधानावर ठाम आहेत.
दरम्यान, पेंटॅगॉन आणि वॉशिंग्टननेही ट्रम्प यांचे विधान मुस्लिमविरोधी असल्याचे सांगत त्यांचे हे विधान राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने नुकसानकारक असल्याचे म्हटले आहे.
ट्रम्प यांचे विधान अत्यंत बेजबाबदार असल्याचे जॉर्डनचे प्रिन्स झैद राद अल-हुसैन यांनी म्हटले आहे. ते संयुक्त राष्ट्राच्या मानवी हक्क समितीचे आयुक्तही आहेत. या विधानामुळे ट्रम्प यांची जॉर्डन भेट बारगळू शकते.
संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस बान की मून, जॉन केरी, डेव्हिड कॅमेरून, फ्रेंचचे पंतप्रधान मॅन्यूएल वॉल्स आणि कॅनडा सरकारने ट्रम्प यांच्यावर या विधानाबद्दल टीका केली आहे.
आपल्या विधानाचे समर्थन करताना ट्रम्प यांनी म्हटले आहे की, अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रूझवेल्ट यांनी १९४१ मध्ये केलेल्या विधानापेक्षा वाईट नाही. (वृत्तसंस्था)