'महात्मा गांधीं'बद्दल चुकीची पोस्ट टाकल्याने डोनाल्ड ट्रम्प अडचणीत
By admin | Published: March 1, 2016 09:39 AM2016-03-01T09:39:40+5:302016-03-01T10:56:20+5:30
'महात्मा गांधी'चा चुकीचा कोट टाकल्याने अमेरिकेच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प अडचणीत सापडले आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. १ - भारताचे राष्ट्रपिता 'महात्मा गांधी'चा चुकीचा कोट टाकल्याने अमेरिकेच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प अडचणीत सापडले आहेत. ट्रम्प यांनी इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर एक पोस्ट टाकली असून ते महात्मा गांधी यांचे वाक्य असल्याचे नमूद केले आहे, मात्र त्यांचा हा डाव त्यांच्यावर उलटला असून गांधीजींनी असे कधीच म्हटले नव्हते असा दावा अमेरिकन मीडियाने केला आहे.
" प्रथम ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतील, नंतर ते तुमच्यावर हसतील आणि मग ते तुमच्याशी भांडतील, (मात्र) अखेर तुमचा विजय होईल - महात्मा गांधी"... अशी पोस्ट अनेक वादग्रस्त विधानासांठी चर्चेत असलेल्या ट्रम्प यांनी समर्थकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. मात्र हे वाक्य गांधीजींचे नाहीच, त्यांनी असे कधीही म्हटले नव्हते असा दावा अमेरिकी मीडियाने केला असून चुकीची पोस्ट शेअर केल्याबद्दल ट्रम्प यांची खिल्ली उडवली जात आहे.