डोनाल्ड ट्रम्पनी पाचवी चर्चा जिंकली

By admin | Published: December 18, 2015 01:58 AM2015-12-18T01:58:08+5:302015-12-18T01:58:08+5:30

अध्यक्षपद निवडणूक उमेदवारी निवड प्रक्रियेतील पाचवी चर्चा रिपब्लिकन पक्षाचे इच्छुक डोनाल्ड ट्रम्प यांनी जिंकली आहे. परराष्ट्र धोरण व राष्ट्रीय सुरक्षा हे विषय चर्चेच्या केंद्रस्थानी होते.

Donald Trumpney won the fifth talk | डोनाल्ड ट्रम्पनी पाचवी चर्चा जिंकली

डोनाल्ड ट्रम्पनी पाचवी चर्चा जिंकली

Next

वॉशिंग्टन : अध्यक्षपद निवडणूक उमेदवारी निवड प्रक्रियेतील पाचवी चर्चा रिपब्लिकन पक्षाचे इच्छुक डोनाल्ड ट्रम्प यांनी जिंकली आहे. परराष्ट्र धोरण व राष्ट्रीय सुरक्षा हे विषय चर्चेच्या केंद्रस्थानी होते.
वन अमेरिकन न्यूज नेटवर्कने चर्चेनंतर मतदान घेतले. त्यात ३५ टक्के नोंदणीकृत रिपब्लिकन मतदारांनी ट्रम्प यांची बाजू घेतली, तर २५ टक्के मते टेक्सासचे सिनेटर टेड क्रूज यांना पडली. मार्को रबियो १४ टक्के मते मिळवून तिसऱ्या क्रमांकावर राहिले. २६ टक्के मतदारांनी बुश अयशस्वी ठरल्याचे मत नोंदवले. ९ टक्के मतदारांनी क्रिस क्रिस्टी यांना मत दिले, तर ह्युलेट व पॅकार्ड कंपनीच्या माजी सीईओ कार्ली फियोरीना व बेन कार्सन हे दोघे प्रत्येकी ५ टक्के मते घेत पाचव्या क्रमांकावर राहिले.
पॅरिस व सन बेर्नार्डिनो दहशतवादी हल्ल्यानंतर प्रथमच सर्व इच्छुक उमेदवार एका व्यासपीठावर आले. दोन घंट्यांपेक्षा अधिक चाललेली चर्चा प्रामुख्याने परराष्ट्र धोरण व राष्ट्रीय सुरक्षेवर केंद्रित होती.

Web Title: Donald Trumpney won the fifth talk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.