अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांची 'म्युझिकल' हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2017 04:17 PM2017-03-16T16:17:30+5:302017-03-16T16:35:39+5:30
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रसिद्ध रॅपर स्नूप डॉगवर नाराजी व्यक्त करत टीका केली
Next
ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 16 - अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रसिद्ध रॅपर स्नूप डॉग याच्यावर नाराजी व्यक्त करत टीका केली आहे. स्नूप डॉग त्याच्या नव्या म्युझिक व्हिडीओमध्ये ट्रम्प यांच्या सारख्याच दिसणा-या एका व्यक्तिवर बंदूक रोखताना दिसत आहे.
'लवेंडर' या गाण्यासाठी बनवण्यात आलेल्या या म्युझिकल व्हिडीओमध्ये राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखे कपडे आणि जोकर सारख्या चेह-याचा एक व्यक्ती दाखवण्यात आला आहे. त्याच्या डोक्यावर स्नूप डॉग बंदूक चालवताना दिसत आहे.
या व्हिडीओवर विविध स्तरातून निरनिराळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. ट्रम्प यांनी बुधवारी स्नूप डॉगला टॅग करून एक ट्विट केलं आहे. स्नूप डॉगने ही बंदूक जर राष्ट्रपती ओबामांच्या दिशेने रोखून धरली असती आणि गोळी चालवली असती तर काय झालं असतं याचा विचार केला आहे का ? त्यांना तुरूंगात जावं लागलं असतं.
Can you imagine what the outcry would be if @SnoopDogg, failing career and all, had aimed and fired the gun at President Obama? Jail time!
— Donald J. Trump (@realDonaldTrump) March 15, 2017
व्हिडीओच्या शेवटी स्नूप ट्रम्प यांच्या कार्टूनवर गोळी चालवताना दिसतो बंदूकीचं ट्रिगर दाबताक्षणी गोळीच्या जागी 'BANG' असं लिहिलेलं एक झेंडा बाहेर येतो.
ट्रम्प यांच्या खासगी वकिलांनी या व्हिडीओवर नाराजी व्यक्त करत, हा व्हिडीओ लाजिरवाणा असून स्नूप डॉगने राष्ट्रपतींची माफी मागायला हवी असं म्हटलं आहे.