डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेतील हलगर्जीपणा भोवला; US सीक्रेट सर्व्हिस प्रमुखाचा राजीनामा...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 10:02 PM2024-07-23T22:02:12+5:302024-07-23T22:02:45+5:30

US Secret Service Director Resigned: यूएस सीक्रेट सर्व्हिस डायरेक्टर किम्बर्ली चीटल यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

Donald Trump's security ; US Secret Service chief Kimberley Cheatle resigns | डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेतील हलगर्जीपणा भोवला; US सीक्रेट सर्व्हिस प्रमुखाचा राजीनामा...

डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेतील हलगर्जीपणा भोवला; US सीक्रेट सर्व्हिस प्रमुखाचा राजीनामा...

Donald Trump Assassination Attempt : काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यावर एका सभेत गोळीबार झाला होता. त्या गोळीबारात ट्र्म्प यांचा जीव थोडक्यात वाचला. आता त्या हल्ल्याच्या 10 दिवसांनंतर त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या अमेरिकन गुप्तचर संस्थेच्या संचालीकेने (US Secret Service Director) आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. 

किम्बर्ली चीटल यांचा राजीनामा
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर सीक्रेट सर्व्हिसवर टीका सुरू झाली. ट्रम्प यांच्यावर हल्ला करणारा हल्लेखोर त्यांच्या रॅलीपासून अवघ्या 140 मीटर अंतरावर होता. तो बंदूक घेऊन इतक्या जवळ कसा आला, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. अखेर सुरक्षेतील हलगर्जीपणाची जबाबदारी घेत अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेच्या प्रमुख किम्बर्ली चीटल (Kimberley Cheatle) यांनी मंगळवारी राजीनामा दिला. 

हल्लेखोर जागीच ठार
13 जुलै रोजी डोनाल्ड ट्रम्प एका रॅलीला संबोधित करत असताना 20 वर्षीय थॉमस क्रूक्सने त्यांच्यावर अनेक गोल्या झाडल्या. या हल्ल्यात ट्रम्प यांचा जीव वाचला, पण एक गोळी त्यांच्या कानाला लागली. तसेच, रॅलीत उपस्थित एका व्यक्तीचाही मृत्यू झाला. यादरम्यान सुरक्षा जवानांनी हल्लेखोराला जागीच गोळ्या घालून ठार केले. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

Web Title: Donald Trump's security ; US Secret Service chief Kimberley Cheatle resigns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.