डोनाल्ड ट्रम्प यांनी 18 वर्षे केली करचुकवेगिरी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2016 08:50 AM2016-10-03T08:50:20+5:302016-10-03T08:50:20+5:30
अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या 18 वर्षांपासून करच भरला नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 3 - अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या 18 वर्षांपासून करच भरला नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. अमेरिकेतील 'द न्यू यॉर्क टाईम्स'च्या वृत्तपत्राने यासंदर्भातील खुलासा केला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर ट्रम्प यांना फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
1995 साली ट्रम्प यांनी 916 मिलियन डॉलर एवढा शेवटचा कर भरला होता. यानंतर ते कर चुकवत आल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरलेल्या उमेदवाराला कराची माहिती देणे बंधनकारक असते, मात्र ट्रम्प यांनी कराबाबतची माहिती सार्वजनिक करण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे. आतापर्यंत झालेल्या निवडणुकीत सर्व उमेदवारांनी आपली कराची माहिती सार्वजनिक केलेली आहे.
आणखी बातम्या:
तर दुसरीकडे, ट्रम्प यांच्या करासंदर्भातील मिळालेली माहिती ही अवैधरित्या मिळवली गेली आहे, असे ट्रम्प यांच्या प्रचारयंत्रणेनं सांगितले आहे. हे वृत्त हिलरी क्लिंटन यांना फायदा मिळवून देण्यासाठीचाच एक भाग आहे, असा आरोप देखील करण्यात आला आहे. दरम्यान, ट्रम्प यांनी केलेल्या करचुकवेगिरीबाबत उपस्थित करण्यात आलेल्या मुद्यांची उत्तरे मात्र देण्यात आली नाहीत.