...अन् सगळं उलटंच घडलं! टॅरिफच्या मुद्द्यावर धावत अमेरिकेत पोहोचलेल्या नेतन्याहू यांना ट्रम्प यांचे दोन झटके
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 11:18 IST2025-04-08T11:18:17+5:302025-04-08T11:18:43+5:30
नेतन्याहू जेव्हा अमेरिकेत पोहोचले, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर आशा आणि सोबत मागण्यांची यादी होती. मात्र आता परतताना त्यांच्या सोबत केवळ निराशा दिसत आहे...

...अन् सगळं उलटंच घडलं! टॅरिफच्या मुद्द्यावर धावत अमेरिकेत पोहोचलेल्या नेतन्याहू यांना ट्रम्प यांचे दोन झटके
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू हंगेरी येथून थेट अमेरिकेत पोहोचले. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भेटल्यानंतर, टॅरिफच्या बाबतीत काही प्रमाणात दिलासा नक्की मिळेल, अशी आशा त्यांना होती. मात्र, झाले उलटेच. नेतन्याहू जेव्हा अमेरिकेत पोहोचले, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर आशा आणि सोबत मागण्यांची यादी होती. मात्र आता परतताना त्यांच्या सोबत केवळ निराशा दिसत आहे.
नेतन्याहू यांनी आपल्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करत, हवाई मार्गाने 400 किलोमीटरहून अधिकचा प्रवास करत व्हाइट हाउस गाठले होते. खरे तर, गाझा नरसंहाराच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाच्या आदेशामुळे त्याच्या डोक्यावर अटकेची तलवार लटकत आहे. दरम्यान, त्यांनी ज्या देशांमध्ये आयसीसीचे नियम लागू होतात, त्या देशांच्या हवाई सीमेतून जाणे नेतन्याहू यांनी टाळले.
नेतन्याहू यांना दोन झटके -
टॅरिफ हटवण्याच्या आशेने अमेरिकेत पोहोचलेल्या नेतन्याहू यांना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून एक नाही तर दोन धक्के मिळाले आहेत. पहिला धक्का म्हणजे, ट्रम्प यांनी इस्रायली वस्तूंवरील १७ टक्के टॅरिफ हटवण्यास नकार दिला. तर दुसरा धक्का म्हणजे, ट्रम्प यांनी इराणसोबत थेट अणुकरारासंदर्भात चर्चा करण्याची घोषणा केली. या विषयावरून इस्रायल आधिपासूनच चिंतित आहे.
निराश नेतन्याहू इस्रायलला परतणार -
नेतन्याहू मंगळवारी दुपारी 12 वाजता अँड्रयूज एअर फोर्स बेसवरून इस्रायलसाठी रवाना होतील. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, नेतन्याहू यांचा अमेरिका दौरा संपत आहे. तथापी, त्यांचा हा दौरा राजकीयदृष्ट्या निराशाजनक मानला जात आहे. ट्रंप यांच्यासोबत झालेल्या बैठकीतून, इस्रायलला ज्या गोष्टींची आशा होती, तसे घडले नाही.