लॉर्ड पॉल यांची विद्यापीठाला देणगी
By admin | Published: April 9, 2015 12:37 AM2015-04-09T00:37:37+5:302015-04-09T00:37:37+5:30
अनिवासी भारतीय उद्योगपती लॉर्ड स्वराज पॉल यांनी व्हुल्व्हरहॅम्पटन विद्यापीठाला १० लाख पौंडांची (दहा कोटी रुपये) देणगी दिली आहे
लंडन : अनिवासी भारतीय उद्योगपती लॉर्ड स्वराज पॉल यांनी व्हुल्व्हरहॅम्पटन विद्यापीठाला १० लाख पौंडांची (दहा कोटी रुपये) देणगी दिली आहे. ब्रिटनमधील या विद्यापीठाला एकरकमी प्राप्त झालेली ही सर्वात मोठी देणगी आहे.
‘अंबिका पॉल फाऊंडेशन’कडून प्राप्त झालेली देणगी विद्यापीठाच्या वेस्ट मिडलँडस् कॅम्पसच्या सुविधा अद्ययावत करण्यावर खर्च करण्यात येणार आहे. पॉल यांनी त्यांच्या कन्येच्या स्मरणार्थ या फाऊंडेशनची स्थापना केली आहे. सामान्य पार्श्वभूमीच्या विद्यार्थ्यांतून ब्रिटनमधील नव्या पिढीचे नेते आणि उद्योजक घडविण्यासाठी हे विद्यापीठ झटते. त्याचे कार्य गौरवशाली आहे. मी दिलेली देणगी या विद्यापीठाशी माझ्या असलेल्या संबंधांचा एक भाग आहे, असे पॉल म्हणाले. (वृत्तसंस्था)