लग्न करू नका, पण मुलं जन्माला घाला! जन्मदर वाढविण्यासाठी चीनचा उपाय...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2023 07:23 AM2023-02-01T07:23:27+5:302023-02-01T07:23:44+5:30
China News: तरुणांची संख्या कमी होऊन वृद्धांची संख्या वाढत असल्याने चीन चिंतेत आहे. यामुळेच चीनने जन्मदर वाढवण्यासाठी पुन्हा एकदा मुलींना लग्न न करताही मुलांना जन्म देण्यासाठी परवानगी दिली आहे.
बिजिंग : तरुणांची संख्या कमी होऊन वृद्धांची संख्या वाढत असल्याने चीन चिंतेत आहे. यामुळेच चीनने जन्मदर वाढवण्यासाठी पुन्हा एकदा मुलींना लग्न न करताही मुलांना जन्म देण्यासाठी परवानगी दिली आहे. यासाठी चीनने अविवाहित मुलींना मुले होण्यावरील अनेक वर्षांपासून सुरू असलेले निर्बंध हटवले आहेत.
सिचुआनच्या आरोग्य आयोगाने जाहीर केले की, यासाठी सर्व लोकांना १५ फेब्रुवारीपासून जन्म नोंदणी करण्याची परवानगी देण्यात येईल. आतापर्यंत, आयोगाने केवळ विवाहित जोडप्यांनाच स्थानिक प्राधिकरणांकडे नोंदणी करण्याची परवानगी दिली होती.
२०२२ मध्ये देशाची लोकसंख्या साठ वर्षांत प्रथमच कमी झाली आहे. त्यामुळे चीनला चिंता आहे.