Corona Vaccination: मास्क नको, सोशल डिस्टन्सिंगही पाळू नका! लसीकरण झालेल्यांना अमेरिकेच्या नव्या गाईडलाईन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 09:15 AM2021-05-14T09:15:17+5:302021-05-14T09:16:04+5:30
CoronaVirus, Corona Vaccination in America: गेल्या महिन्याचा शेवटच्या आठवड्यात अमेरिकेची प्रमुख आरोग्य संस्था सीडीसीने स्पष्टपणे अमेरिकी नागरिकांना मास्क न घालण्याची सूचना केली होती. ज्या नागरिकांनी कोरोना लसीकरण पूर्ण केले आहे त्यांनी अनोळखी लोकांची गर्दी सोडून अन्यत्र कुठेही फिरताना मास्क घालण्याची गरज नाही, असे म्हटले होते. मात्र, आज कुठेही मास्क न लावता फिरू शकता असे म्हटले आहे.
No mask, No social distence America: एकीकडे जगभरातील देश कोरोनाच्या संकटाशी (Corona Pandemic) लढत आहेत, दुसरीकडे अमेरिकेच्या लोकांसाठी दिलासादायक बातमी आहे. अमेरिकेत पूर्णपणे लसीकरण झालल्या लोकांनी मास्क घालणे किंवा सोशल डिस्टंसिंग पाळणे आवश्यक राहिलेले नाही. याबाबत अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने (सीडीसी) सूचना दिल्या आहेत. (Fully vaccinated individuals can resume activities without wearing a mask or staying 6 feet apart: America CDC)
गेल्या महिन्याचा शेवटच्या आठवड्यात अमेरिकेची प्रमुख आरोग्य संस्था सीडीसीने स्पष्टपणे अमेरिकी नागरिकांना मास्क न घालण्याची सूचना केली होती. ज्या नागरिकांनी कोरोना लसीकरण पूर्ण केले आहे त्यांनी अनोळखी लोकांची गर्दी सोडून अन्यत्र कुठेही फिरताना मास्क घालण्याची गरज नाही, असे म्हटले होते. मात्र, आज कुठेही मास्क न लावता फिरू शकता असे म्हटले आहे.
मास्क फ्री देश बनण्याबरोबरच कोरोना दूर ठेवण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळावे लागत होते, ते देखील आता लस घेतलेल्यांनी पाळण्याची गरज नसल्याचे सीडीसीने म्हटले आहे. लसीचे दोन डोस घेतलेले लोक आता त्यांची दैनंदिन कामे बिनदिक्कत करू शकतात. मात्र, ज्या संघीय, र्जाय, आदिवासी, लोकल बिझनेस, कामाच्या ठिकाणी जिथे मास्क घालणे अनिवार्य केले आहे तिथे मास्क घालावे लागले असे नव्या गाईडलाईनमध्ये म्हटले आहे.
Fully vaccinated individuals can resume activities without wearing a mask or staying 6 feet apart: US Centers for Disease Control and Prevention (CDC)#COVID19pic.twitter.com/b5Xo4H1AuQ
— ANI (@ANI) May 13, 2021
इस्त्रायल बनला पहिला देश
चीनमधून पसरलेला कोरोना व्हायरस आज जगभरात थैमान घालत आहे. कोरोना व्हायरस 2019च्या अखेरीस चीनमधील वुहान शहरातून पसरला. कोरनाचे स्क्रमण एवढ्या वेगाने परसले, की त्यांने अल्पावधीतच कोट्यवधी लोकांना आपल्या विळख्यात घेतले, तर लाखो लोकांना यामुळे जीव गमवावा लागला. इस्रायलने मास्क न लावण्याचे आदेश दिले आहेत. असा आदेश देणारा इस्रायल हा जगातील पहिलाच देश ठरला आहे. इस्रायलमध्ये 81 टक्के लोकांना कोरोना लस टोचण्यात आली आहे. यानंतर येथील प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयानंतर येथील लोकांनी चेहऱ्यावरील मास्क काढले असून सोशल मीडियावरही आनंद व्यक्त केला आहे.
अमेरिकेत 12-15 वयोगटाच्या लसीकरणाला परवानगी
कोरोना महामारीच्या (Corona Virus) विरोधात सुरु असलेल्या लढ्याला अमेरिकेमधून मोठी दिलासादायक बातमी येत आहे. फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (FDA) ने 12 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांच्या कोरोना लसीला (Corona Vaccine) मान्यता दिली आहे. फायझर-बायोएनटेकने ही कोरोना लस (Pfizer-BioNTech COVID Vaccine) बनविली आहे. ही लस किशोरवयीनांना दिली जाणार आहे. गुरुवारपासून अमेरिकेत या वयोगटासाठी लसीकरण