समुद्र गिळणार अनेक देश! ‘डूम्सडे ग्लेशिअर’वितळणे जगासाठी धोकादायक ठरणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2021 08:19 AM2021-12-28T08:19:31+5:302021-12-28T08:20:02+5:30

Doomsday Glacier : हिमनदीवरील कडे कोसळण्यास सुरुवात झाली तर समुद्राच्या पातळीत ६५ सेंटिमीटरची वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अर्थातच जलप्रलय येऊ शकतो.

Doomsday Glacier Threat: Rapid Retreat of Antarctica's Riskiest Glacier | समुद्र गिळणार अनेक देश! ‘डूम्सडे ग्लेशिअर’वितळणे जगासाठी धोकादायक ठरणार 

समुद्र गिळणार अनेक देश! ‘डूम्सडे ग्लेशिअर’वितळणे जगासाठी धोकादायक ठरणार 

googlenewsNext

अंटार्क्टिका खंड हा हिमनद्यांमुळे ओळखला जातो. जागतिक तापमानवाढीमुळे त्यातील अनेक हिमनद्या वितळण्यास सुरुवात झाली आहे. त्यातही ‘डूम्सडे ग्लेशिअर’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या हिमनदीचे वितळणे जगासाठी धोकादायक ठरणार आहे. या हिमनदीवरील कडे कोसळण्यास सुरुवात झाली तर समुद्राच्या पातळीत ६५ सेंटिमीटरची वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अर्थातच जलप्रलय येऊ शकतो.

काय आहे हा डूम्सडे ग्लेशिअर?
ही अंटार्क्टिका खंडातील हिमनदी असून या ठिकाणी अनेक मोठमोठे हिमनग आहेत. डूम्सडे ग्लेशिअरचे क्षेत्रफळ ८० मैल असून त्याचा आकार ब्रिटनएवढा आहे. सन २००० पासून हे हिमनग वितळण्याची प्रक्रिया सुरू असून आतापर्यंत १००० अब्ज टन बर्फ वितळला आहे.

ग्लेशिअर पूर्ण वितळल्यास काय?
३० वर्षांत डूम्सडे ग्लेशिअरच्या वितळण्याचा वेग वाढला आहे. हा ग्लेशिअर अधिक काळ स्थिर राहणे कठीण आहे. जागतिक हवामान तज्ज्ञांच्या मते सन १९०० पासून समुद्राच्या पातळीत २० टक्के वाढ झाली आहे. डूम्सडे ग्लेशिअर पूर्णपणे वितळले तर त्यामुळे समुद्राच्या पातळीत ६५ सेमी वाढ होण्याचा धोका आहे.

परिणाम काय होतील?
शांघाय, न्यूयॉर्क, मायामी, टोकियो व मुंबई यांसारखी किनारपट्टीवरील महानगरे पाण्याखाली जातील. किरिबाती, तुवालू आणि मालदीव यांसारखी बेटांनी बनलेले देश सागराच्या पोटात विलीन होतील. किनारपट्टी परिसरातील लाखो लोक बेघर होतील.
अनेक बेटे समुद्र गिळंकृत करेल, असा तज्ज्ञांचा अंदाज.

Web Title: Doomsday Glacier Threat: Rapid Retreat of Antarctica's Riskiest Glacier

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.