जकार्तामध्ये दुहेरी बॉम्बस्फोट, दोन ठार
By admin | Published: May 24, 2017 09:19 PM2017-05-24T21:19:11+5:302017-05-24T22:26:12+5:30
इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे दुहेरी बॉम्बस्फोट झाल्याचे वृत्त आहे. या बॉम्बस्फोटात तीन जण ठार झाले असून अनेक जन जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
जकार्ता, दि. 24 - इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे दुहेरी बॉम्बस्फोट झाल्याचे वृत्त आहे. या बॉम्बस्फोटात दोन जण ठार झाले असून अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, इंडोनेशियाच्या पूर्वेकडील जकार्ता भागात असलेल्या बस ट्रान्सपोर्ट टर्मिनलजवळ दुहेरी बॉम्बस्फोट झाले. स्थानिक वेळेनुसार रात्री 9 च्या सुमारास पाच मिनिटांच्या अंतराने हे स्फोट झाले. यामध्ये दोन जण ठार झाले असून अनेक जण जखमी झाल्याचे समजते. दरम्यान, हे स्फोट आत्मघाती हल्ला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याचबरोबर या स्फोटांत वित्तहानीही मोठ्या प्रमाणात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून जखमींना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Explosion in Indonesia"s east Jakarta near bus station reports Reuters quoting police pic.twitter.com/YIzuwe1kPx
— ANI (@ANI_news) May 24, 2017