इमारतीत घुसली डबलडेकर बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 02:03 PM2017-08-11T14:03:54+5:302017-08-11T14:05:38+5:30

लंडनमध्ये सेवा देणाऱ्या प्रसिद्ध बससेवेतील एक डबलडेकर बस इमारतीत घुसल्यामुळे झालेल्या अपघातात 10 लोक जखमी झाले आहेत.

Double penetration double-decker buses | इमारतीत घुसली डबलडेकर बस

इमारतीत घुसली डबलडेकर बस

Next

लंडन, दि. 11- लंडनमध्ये सेवा देणाऱ्या प्रसिद्ध बससेवेतील एक डबलडेकर बस इमारतीत घुसल्यामुळे झालेल्या अपघातात 10 लोक जखमी झाले आहेत. क्लॅफाम जंक्शन या स्थानकाजवळील लव्हेंडर हिल येथे एका दुकानामध्येच ही बस घुसली आहे. हा अपघात झाल्यावर लंडनच्या रुग्णवाहिका सेवेने तात्काळ घटनास्थळी पोहोचून 10 जखमींना मदत केली तसेच तीन लोकांना रुग्णालयात दाखल केले. तसेच बसच्या वरच्या भागात बसलेल्या दोन प्रवाशांचीही सुटका केली. ज्या दुकानामध्ये ही बस घुसली त्या दुकानाच्या दोन्ही बाजूच्या काचा यामुळे फुटल्या आहेत. अपघात झाल्यानंतर सुरक्षेसाठी म्हणून येथील रस्ते बंद करण्यात आले होते.

लंडनमधील रेड डबलडेकर बसला स्वतःची ओळख आहे. या बस आणि लंडन शहराचे अतूट असे विशेष नाते आहे. ब्रिटीशांच्या आफ्रिका आणि भारतासारख्या आशियातील वसाहतींमध्ये देखिल ही डबलडेकर बससेवा सुरु करण्यात आली. सुरुवातीच्या काळामध्ये डबलडेकरचा चालक एका वेगळ्या कॅबमध्ये बसत असे आणि प्रवाशांसाठी वेगळी सोय केलेली असे, त्यानंतर लंडनमध्ये उघड्या छताच्या डबलडेकर बसेसही चालवल्या जातात. लंडन शहर पाहायचे असेल तर डबलडेकरच्या वरच्या मजल्यात बसून पाहावे असे म्हटले जाते. मुंबईमध्ये इंग्लंडच्या ब्रिटीश इलेक्ट्रीक ट्रॅक्शन कंपनीने १९०४ साली विजेच्या वितरणाच्या परवान्यासाठी विनंती केली. त्यासाठी ब्रश इलेक्ट्रीकल इंजिनियरिंग कंपनीने एजंट म्हणून काम पाहिले. बॉम्बे ट्रामवे कंपनी, मुंबई महानगरपालिका, ब्रश कंपनी यांच्यामध्ये ३१ जुलै १९०५ रोजी करार होऊन हा परवाना देण्यात आला. १९०५मध्ये बेस्ट म्हणजेच बॉम्बे इलेक्ट्रीक सप्लाय अँड ट्रामवे कंपनीची स्थापना करण्यात आली. 1907 साली घोड्य़ांनी ओढल्या जाणाऱ्या ट्राम बंद करुन मुंबईमध्ये पहिली इलेक्ट्रीक ट्राम धावली तर 1926 साली डबलडेकर ट्रामही शहरात आली. त्यानंतर या कंपनीने शहरामध्ये बससेवा सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. 15 जुलै 1926 साली शहरात पहिली बस अफगाण चर्च ते क्रॉफर्ड मार्केट या रस्त्यावर धावली.

Web Title: Double penetration double-decker buses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.