Covishield च्या दोन डोसमधील कालावधी वाढवणं हा योग्यच निर्णय : डॉ. अँथनी फाउची
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 02:30 PM2021-05-14T14:30:26+5:302021-05-14T14:35:38+5:30
Dosage interval for Covishield: सरकारनं कोविशिल्ड या लसीच्या दुसऱ्या डोसमधील अंतर वाढवून ते १२ ते १६ आठवडे केलं आहे. कोवॅक्सिनच्या दोन डोसच्या अंतरात कोणताही बदल करण्यात आला नाही.
Dosage interval for Covishield: देशात कोरोना लसीची प्रचंड टंचाई (Corona Vaccine Shortage) भासू लागली आहे. पहिला डोस घेतलेल्यांना दुसरा डोस घेण्यासाठी वारंवार लसीकरण केंद्राच्या (Vaccination centers) चकरा माराव्या लागत आहेत. यामुळे आधी ३० दिवसांत लसीचा दुसरा डोस घेण्यास सांगण्यात आलं होतं. परंतु नंतर सरकारनं हा कालावधी ४५ दिवसांवर नेला होता. आता या अंतरात आणखी करण्यात आली आहे. आता नागरिकांना कोविशिल्ड या लसीचा दुसरा डोस १२ ते १६ आठवड्यांदरम्यान देण्यात येणार आहे. (The immunisation panel has recommended increasing the gap between two doses of Covishield vaccine to 12-16 weeks. No change in dosage interval for Covaxin has been suggested by the panel.) पॅनलनं केलेल्या शिफारसी सरकारनं मान्य केल्या आहेत. यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथनी फाउची यांनी हे उचलण्यात आलेलं पाऊल म्हणजे योग्य निर्णय असल्याची प्रतिक्रिया दिली.
"कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवलं गेलं ही उत्तम पद्धत आहे. भारत सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे आणि अशा परिस्थितीत अधिकाधिक लोकांचं लसीकरण होणं आवश्यक आहे. यासाठी नव्या पद्धतींचा अवलंब करणंही आवश्यक आहे. यामुळे ही पद्धत अगदी योग्य आहे असं माझं मानणं आहे," असं डॉ. अँथनी फाउची म्हणाले.
#WATCH Vaccine passport isn't going to be mandated from federal standpoint in US. Travel is going to depend on level of infection. India has very high level of infection. It'd be difficult to resume travel there right now: Dr Anthony Fauci, top US infectious disease expert to ANI pic.twitter.com/yy9HxdQnve
— ANI (@ANI) May 14, 2021
"तुम्हाला लस उत्पादनाची क्षमता वाढवण्याच्या सुविधा निर्माण करण्यासोबतच आणखी कंपन्यांसोबतही काम करावं लागेल. लस उत्पादन करणाऱ्या देशांपैकी भारत महत्त्वाच्या देशांपैकी एक आहे. आपल्या लोकांसाठी काही स्रोतांचा वापर करणं आवश्यक आहे," असंही त्यांनी ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केलं. "दोन डोसमधील अंतर वाढवणं फायदेशीर आहे. जेव्हा तुमच्याकडे लसींची कमतरता आहे तेव्हा पहिल्या आणि दुसऱ्या डोसमधील अंतर वाढवल्यानं मोठ्या प्रमाणात लोकांना पहिला डोस मिळू शकतो. ही एक उत्तम पद्धत आहे. दोन डोसमध्ये अधिक अंतर असल्यानं लसीच्या क्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता नाही," असंही फाउची यांनी स्पष्ट केलं.
यावेळी डॉ. फाउची यांनी स्पुटनिक व्ही (Sputnik V) या लसीवरही भाष्य केलं. "मी स्पुटनिक व्ही या लसीबद्दल ऐकलं आहे आणि ती लस अधिक प्रभावी वाटते," असंही ते म्हणाले. याशिवाय त्यांनी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाबद्दल भारताला सल्लाही दिला. भारतानं या परिस्थितीचा सामना करण्यासाठी शसस्त्र दलांचा वापर केला पाहिजे असंही ते म्हणाले.
कोवॅक्सिनच्या कालावधीत बदल नाही
केंद्र सरकारची कोरोना सल्लागार समितीने सीरम इन्स्टिट्यूट बनवत असलेली ऑक्सफर्डच्या कोविशिल्डचा दुसरा डोस देण्याचा कालावधी वाढविण्याची शिफारस केली होती. कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर १२ ते १६ आठवड्यांनी वाढविण्यास सांगण्यात आलं होतं. सध्या कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर हे चार ते आठ आठवड्यांचं करण्यात आलं आहे. महत्त्वाचं म्हणजे भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोसचा कालावधी तसाच ठेवण्यात आला आहे. तो चार आठवड्यांचा आहे.