जपानमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण
By Admin | Published: September 10, 2015 04:14 PM2015-09-10T16:14:04+5:302015-09-10T16:15:13+5:30
जपानमधील कोयासान विद्यापीठात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
ऑनलाइन लोकमत
टोकियो, दि. १० - जपानमधील कोयासान विद्यापीठात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. कोसायन विद्यापीठात बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारु दिल्याबद्दल स्थानिक प्रशासनाचे आभारी असून भारतीय व महाराष्ट्रातील जनतेकडून ही कोयासन विद्यापीठाला भेट आहे अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या पाच दिवसांच्या जपान दौ-यावर असून गुरुवारी देवेंद्र फडणवीस यांनी कोयासन विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. जपानमध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याचे अनावरण करणे ही गौरवास्पद व अभिमानाची बाब आहे असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी उद्योगमंत्री सुभाष देसाई, रामदास आठवले आदी मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यापूर्वी कोयासन विद्यापीठ व राज्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये करार करण्यात आला.