अमेरिकेत नाट्यमय घडामोडी! ट्रम्प यांनी जेलमध्ये सरेंडर केले, २० मिनिटांत बाहेरही पडले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 07:41 AM2023-08-25T07:41:13+5:302023-08-25T07:41:25+5:30

ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्ष पद सोडतेवेळी झालेला दंगा पाहता तुरुंगाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Dramatic events in America! Donald Trump surrendered in jail, walked out within 20 minutes after mugshot, Arrested | अमेरिकेत नाट्यमय घडामोडी! ट्रम्प यांनी जेलमध्ये सरेंडर केले, २० मिनिटांत बाहेरही पडले

अमेरिकेत नाट्यमय घडामोडी! ट्रम्प यांनी जेलमध्ये सरेंडर केले, २० मिनिटांत बाहेरही पडले

googlenewsNext

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीवेळी फसवणूक केल्याप्रकरणी अटलांटाच्या फुल्टन काऊंटी तुरुंगात सरेंडर केले आहे. ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्ष पद सोडतेवेळी झालेला दंगा पाहता तुरुंगाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. परंतू, ट्रम्प हे सरेंडर झाल्याच्या २० मिनिटांनी पुन्हा तुरुंगाबाहेर आले. या नाट्यमय घडामोडींमुळे अमेरिकेच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. 

तुरुंगातून बाहेर येत ट्रम्प यांचा ताफा अटलांटाच्या हर्ट्सफील्ड-जॅक्सन एयरपोर्टकडे वळला आणि तिथून खासगी विमानाने ते न्यू जर्सी गोल्फ क्लबला रवाना झाले. या सगळ्या घडामोडींवर शेरीफ कार्यालयाने सांगितले की ट्रम्प यांना औपचारिकरित्या अटक करण्यात आली आहे. ट्रम्प यांचा गुन्हेगारांसारखा मगशॉट म्हणजेच वेगवेगळ्या अँगलने फोटो घेण्यात आले आहेत. 

ट्रम्प यांच्या चौथ्या अटकेनंतर फुल्टन काउंटी जेलने एक मग शॉट जारी केला आहे. जॉर्जियामध्ये ट्रम्प यांनी आत्मसमर्पण केल्यानंतर हा फोटो प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यात ट्रम्प हे निळ्या रंगाचा ब्लेझर आणि लाल टाय परिधान करून कॅमेऱ्याकडे टक लावून पाहत आहेत असे दिसत आहेत. 

2020 च्या यूएस निवडणुकीचे निकाल बदलवण्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रयत्नांची चौकशी करणाऱ्या विशेष वकिलाने 45 पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. यामध्ये ट्रम्प यांच्यावर 4 आरोप करण्यात आले होते. 1- युनायटेड स्टेट्सची फसवणूक करण्याचा कट, 2- सरकारी कार्यवाहीमध्ये अडथळा आणण्याचे षड्यंत्र, 3- अधिकृत कार्यवाहीमध्ये अडथळा आणणे आणि अडथळा आणण्याचा प्रयत्न करणे. 4- हक्कांविरुद्ध कट असे हे आरोप होते. 
 

Web Title: Dramatic events in America! Donald Trump surrendered in jail, walked out within 20 minutes after mugshot, Arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.