टोल रोडवरून वारंवार जाणं पडलं महाग, खात्यातून दणक्यात उडाले 43 लाख रुपये अन् मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 06:21 PM2022-04-04T18:21:38+5:302022-04-04T18:22:27+5:30
जेसन क्लॅंटनच्या खात्यातून दर वेळी सुमारे 75 हजार रुपये कापले गेले. ट्रान्सपोर्ट एजन्सीने एकदा तर त्याच्याकडून तब्बल 13 लाख रुपये वसूल केले होते.
टोलनाक्यावरून वारंवार जाणाऱ्या ट्रकचालकाच्या खात्यातून सुमारे 43 लाख रुपये शुल्क कापण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खरे तर, ट्रान्सपोर्ट एजन्सीच्या चुकीमुळे हा प्रकार घडला. ट्रक चालकाने त्याचे पैसे परत मागितले असता त्याला खात्यात पैसे रिफंड करण्यास नकार देण्यात आला आणि क्रेडिट नोट घेण्यास सांगण्यात आले.
हे प्रकरण ऑस्ट्रेलियातील आहे. येथील न्यू साउथ वेल्समधील टोल रोडवरून जाताना जेसन क्लॅंटनच्या खात्यातून दर वेळी सुमारे 75 हजार रुपये कापले गेले. ट्रान्सपोर्ट एजन्सीने एकदा तर त्याच्याकडून तब्बल 13 लाख रुपये वसूल केले होते. यासंदर्भात, आपण क्लेंटनचे पैसे क्रेडिट नोटच्या माध्यमाने परत करू, असे स्टेट ट्रांसपोर्ट आणि रोड एजन्सीने म्हटले आहे.
मात्र, ट्रक ड्रायव्हरने ट्रांसपोर्ट एजन्सीची ही ऑफर धुडकावली आहे. ऑस्ट्रेलियाच्या 2GB रेडिओशी बोलताना जेसन क्लेंटन म्हणाले, न्यू साउथ वेल्स आणि ई-टोलने माझ्यासोबत अत्यंत घाणेरड्या प्रकारची मजाक केली आहे. मी पूर्णपणे निराश झालो आहे. क्रेडिट नोट हा पर्याय माझ्यासाठी अजिबात योग्य नाही.
ज्या लोकांकडून टोल रोड वापरल्याबद्दल चुकून रेग्युलर चार्जच्या डबल पैसे वसूल केले गेले, त्या 45,000 लोकांपैकी एक क्लेंटनही आहेत. या प्रकाराबद्दल न्यू साउथ वेल्स ट्रांसपोर्ट चीफ ऑपरेशन ऑफिसर हावर्ड कॉलिन्स यांनी माफीही मागितली आहे. तसेच ज्या ड्रायव्हर्सकडून अधिकचे पैसे वसूल केले गेले त्या सर्वांना संस्था रिफंड करेल, असे म्हटले आहे.