Drone attack in Saudi Arabia: सौदी अरेबियातील विमानतळावर ड्रोन हल्ला; ८ जण जखमी, प्रवासी विमानाचंही नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 03:27 PM2021-08-31T15:27:47+5:302021-08-31T15:28:56+5:30

Drone attack in Saudi Arabia: सौदी अरेबियातील दक्षिण-पश्चिम भागाताली एका विमानतळावर स्फोटकांनी भरलेल्या ड्रोननं मोठा स्फोट घडवून आणण्यात आला आहे.

Drone attack on Saudi Arabia Abha airport wounds eight Yemen Houthi Rebels | Drone attack in Saudi Arabia: सौदी अरेबियातील विमानतळावर ड्रोन हल्ला; ८ जण जखमी, प्रवासी विमानाचंही नुकसान

Drone attack in Saudi Arabia: सौदी अरेबियातील विमानतळावर ड्रोन हल्ला; ८ जण जखमी, प्रवासी विमानाचंही नुकसान

Next

Drone attack in Saudi Arabia: सौदी अरेबियातील दक्षिण-पश्चिम भागाताली एका विमानतळावर स्फोटकांनी भरलेल्या ड्रोननं मोठा स्फोट घडवून आणण्यात आला आहे. या ड्रोन हल्ल्यात ८ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली असून विमानतळावर उभ्या असलेल्या एका प्रवासी विमानाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. स्थानिक सरकारी वृत्तवाहिनीनंही या हल्ल्याला दुजोरा दिला आहे. येमेनमध्ये हूती विद्रोहींच्या विरोधात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियावर हा हल्ला झाला आहे. दरम्यान या हल्ल्याची अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेनं जबाबादीर स्वीकारलेली नाही. (Drone attack on Saudi Arabia Abha airport wounds eight Yemen Houthi Rebels)

गेल्या २४ तासांत सौदी अरेबियाच्या अबहा विमानताळवर झालेला हा दुसरा हल्ला आहे. याआधी देखील अशाच प्रकारचा हल्ला झाला होता. पण त्यात कोणत्याही प्रकारचं नुकसान झालं नव्हतं. येमेनमध्ये इराण समर्थक शिया विद्रोहींशी लढणाऱ्या सौदी अरेबियाच्या नेतृत्त्वाखालील सैन्य संघटनेनं या हल्ल्याबाबत अद्याप कोणतीही सविस्तर माहिती दिलेली नाही. यात नेमकं किती लोक जखमी झाले आहेत याचीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण यात किमान ८ जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. विस्फोटक ड्रोनला पाडल्याचा दावा देखील सौदीच्या सैन्यानं केला आहे. 

फेब्रुवारीतही झाला होता हल्ला
येमेनच्या हूती विद्रोहकांनी सौदीतील अबहा आंतरराष्ट्रीय विमानतळावर हल्ला केला होता. या हल्ल्यात एका प्रवासी विमानाला आग लागली होती. अग्निशमन दलानं तातडीनं आगीवर नियंत्रण मिळवलं होतं. यात कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झाली नव्हती. सौदी अरेबियातील सामान्य नागरिकांना जाणूनबुजून लक्ष्य केलं जात असल्याचा आरोप कर्नल तुर्की अल मलिकी यांनी केला होता. 

Web Title: Drone attack on Saudi Arabia Abha airport wounds eight Yemen Houthi Rebels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.