ड्रोनच्या क्रेझने 'तो' वयाच्या 23 व्या वर्षी बनला करोडपती; 2 वर्षात जमवला 30 कोटी डॉलर फंड
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 11:50 AM2023-04-12T11:50:21+5:302023-04-12T11:51:28+5:30
इंजिनीअरिंगचा विद्यार्थी असलेल्या रेसनिकने या घटनेनंतर लगेचच ड्रोनचा शोध लावला. गोळीबार किंवा अशा कोणत्याही घटनेत तो पोलिसांना ड्रोनच्या माध्यमातून मदत करू लागला.
अमेरिकेत 2017 मध्ये एका रिसॉर्टमध्ये गोळीबाराच्या घटनेत अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. ही घटना एका 17 वर्षीय तरुणाच्या डोळ्यांसमोर घडली. लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करूनही तो काही करू शकला नाही, तेव्हाच त्याच्या मनात ड्रोनची कल्पना आली, जी अशा घटनांना तोंड देताना सुरक्षा दलांचे डोळे आणि कान बनू शकते. या ड्रोन क्रेझने 23 वर्षीय ब्लेक रेसनिकला आता करोडपती बनवलं आहे. त्याचे 'ब्रिंक ड्रोन' हे स्टार्टअप अनेक देशांना ड्रोन विकत आहे.
पोलिसांना होतेय मदत
इंजिनीअरिंगचा विद्यार्थी असलेल्या रेसनिकने या घटनेनंतर लगेचच ड्रोनचा शोध लावला. गोळीबार किंवा अशा कोणत्याही घटनेत तो पोलिसांना ड्रोनच्या माध्यमातून मदत करू लागला. रेसनिकने ड्रोन निर्माता म्हणून आपला ठसा उमटवला आणि 'ब्रिंक ड्रोन' नावाची कंपनी स्थापन केली.
'ब्रिंक'साठी उभारला निधी
रेसनिकने स्वतःची कंपनी सुरू करण्यापूर्वी टेस्ला येथे इंटर्नशिपही केली होती. कंपनीने 2021 च्या सुरुवातीपासून ड्रोनची विक्री सुरू केली. या वर्षापासून, कंपनीने फंडच्या रुपात 30 कोटी डॉलर उभे केले. कंपनीत 50 हून अधिक इंजिनिअर कार्यरत आहेत.
धोकादायक परिस्थितीत लोकांचे संरक्षण करण्याच्या मिशनचा एक भाग म्हणून रेसनिकने फंडासाठी गुंतवणूकदारांना आकर्षित केले आहे. ड्रोन स्टार्टअपची स्थापना करणाऱ्या रेसनिकची वैयक्तिक संपत्ती 10 कोटी डॉलर आहे. सध्या त्याची जोरदार चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"