एअर डिफेन्स भेदत नेतन्याहू यांच्या निवासस्थानाजवळ कोसळलं लेबेनॉनमधून आलेलं ड्रोन, इस्राइलमध्ये खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 01:43 PM2024-10-19T13:43:56+5:302024-10-19T13:45:22+5:30
Israel News: असताना हिजबुल्लाहने लेबेनॉनमधून इस्राइलमध्ये एक मोठा ड्रोन हल्ला केला आहे. हा हल्ला इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin netanyahu ) यांना लक्ष्य करून करण्यात आला. हैफामधील कैसरिया परिसरात झालेल्या या हल्ल्यात लेबेनॉनमधून आलेलं ड्रोन इस्राइलचा एअर डिफेन्स भेदत थेट बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानाजवळ येथून पडलं
मागच्या काही दिवसांपासून तुफानी हल्ले करत इस्राइलने हमास आणि हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनांचं कंबरडं मोडलं आहे दरम्यान, इस्राइलने नुकतेच हमासचा प्रमुख याह्या सिनवारी यालाही ठार केले होते. या लढ्यात इस्राइल वरचढ ठरत असताना हिजबुल्लाहने लेबेनॉनमधून इस्राइलमध्ये एक मोठा ड्रोन हल्ला केला आहे. हा हल्ला इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना लक्ष्य करून करण्यात आला. हैफामधील कैसरिया परिसरात झालेल्या या हल्ल्यात लेबेनॉनमधून आलेलं ड्रोन इस्राइलचा एअर डिफेन्स भेदत थेट बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानाजवळ येथून पडलं.
इस्राइलच्या सुरक्षा यंत्रणांकडून या हल्ल्याला दुजोरा देण्यात आला आहे. तसेच हा ड्रोन मोकळ्या जागेत पडल्याचं सांगण्यात आलं आहे. आयडीएफने सांगितलं की, आज सकाळी हैफामध्ये वाजलेले वॉर्निंग सायरन हे लेबेनॉनमधून डागण्यात आलेल्या रॉकेटांमुळे वाजले होते.
इस्राइली प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार दक्षिण हैफामधील कैसरिया परिसरात पंतप्रधान नेतन्याहू यांच्या निवासस्थानाजवळ एका ड्रोनचा स्फोट झाला. हे ड्रोन थेट आपल्या लक्ष्याचा भेद करण्यामध्ये सक्षम होतं. इस्राइलचा एअर डिफेन्स या ड्रोनला रोखण्यात अपयशी ठरल्याचे इस्राइलच्या सुरक्षा यंत्रणांनी मान्य केलं आहे.