ड्रोन-जेटची टक्कर थोडक्यात टळली

By admin | Published: March 20, 2016 03:47 AM2016-03-20T03:47:02+5:302016-03-20T03:47:02+5:30

लुफ्थहंसा एअरलाईनचे जेट विमान आणि ड्रोन यांची येथील आंतरराष्ट्रीय विमानतळानजीक टक्कर थोडक्यात टळली. यावेळी ड्रोन विमान जेटपासून २०० फूट अंतरावर होते.

Drone-jet collision briefly avoided | ड्रोन-जेटची टक्कर थोडक्यात टळली

ड्रोन-जेटची टक्कर थोडक्यात टळली

Next

लॉस एंजिल्स : लुफ्थहंसा एअरलाईनचे जेट विमान आणि ड्रोन यांची येथील आंतरराष्ट्रीय विमानतळानजीक टक्कर थोडक्यात टळली. यावेळी ड्रोन विमान जेटपासून २०० फूट अंतरावर होते. मानवी विमाने आणि मानवरहित ड्रोन यांच्यातील अपघात टळण्याची ही आणखी एक ताजी घटना आहे.
लुफ्थहंसा एअरलाईन्सचा वैमानिक ए-३८० हे जेट विमान विमानतळावर उतरण्याच्या तयारीत असतानाच स्थानिक वेळेनुसार दुपारी १-३० वाजता ड्रोन विमान त्याच्या विमानाकडे येताना दिसले, असे फेडरल उड्डयन प्रशासनाच्या एका प्रवक्त्याने सांगितले.
हा प्रकार घडला त्यावेळी जेट विमान पाच हजार फूट उंचीवर होते आणि विमानतळापासून पूर्वेला १४ मैल अंतरावर होते. विमानतळाच्या या दिशेला घनदाट लोकवस्ती असलेली उपनगरे आहेत. या भागावर विमानांची टक्कर झाली असती तर मोठा अनर्थ घडला असता. या घटनेबाबत लुफ्थहंसा एअरलाईन्सचा प्रवक्ता लगेचच प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकला नाही. सध्या मानवरहित ड्रोन विमाने लोकप्रिय असून असे प्रकार यापूर्वीही घडले आहेत. (वृत्तसंस्था)

त्यामुळे पोलिसांना अशा ड्रोन विमानांच्या हालचालींवर लक्ष्य ठेवण्यास सांगण्यात आले आहे, पण ही ड्रोन विमाने कोठून उतरतात, कोठून उड्डयन करतात हे समजत नाही. (वृत्तसंस्था)
गेल्या वर्षी कॅलिफोर्नियातील प्रशासनाने ड्रोन विमानांच्या उड्डयनावर निर्बंध घालणारे व त्यासाठी परवानगी आवश्यक असणारे विधेयक मांडले होते. यापूर्वी घडलेल्या अशा घटना ध्यानात घेऊन ते मांडण्यात आले होते. ताज्या घटनेत विमान आणि ड्रोन यांची टक्कर झाली असती तर मोठीच हानी झाली असती. हे आम्हाला कधीही मान्य होणार नाही, असे एका प्रवक्त्याने सांगितले.
ड्रोन हे पक्ष्याप्रमाणे विमानाच्या इंजिनात घुसले तर इंजिन बिघडते आणि विमान दुर्घटनाग्रस्त होऊ शकते, त्यामुळे सरकार आणि उद्योगक्षेत्रात अशा घटनांवर तीव्र चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आतापर्यंत ड्रोन आणि प्रवासी विमान यांच्यात थेट टक्कर होऊन अपघात झाला नसला तरीही अपघात थोडक्यात टळण्याच्या २४१ घटना घडल्या आहेत.

Web Title: Drone-jet collision briefly avoided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.