फक्त दोन आंब्यांची चोरी, कर्मचाऱ्याला पडली भारी; झाला तब्बल एवढा दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 11:15 AM2019-09-24T11:15:32+5:302019-09-24T11:42:24+5:30
एका व्यक्तीला चोरून आंबा खाणं चांगलंच महागात पडलं आहे.
आंबा हे फळ प्रत्येकाच्याच आवडीचं आहे. मात्र एका व्यक्तीला चोरून आंबा खाणं चांगलंच महागात पडलं आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर काम करणाऱ्या एका व्यक्तीला प्रवाशाच्या सामानातील आंबा चोरल्याप्रकरणी कोर्टात फेऱ्या माराव्या लागल्या आहेत. आंबा खाणं व्यक्तीला चांगलंच महागात पडलं असून तब्बल 96 हजारांचा दंड भरावा लागणार आहे. कोर्टाने व्यक्तीला शिक्षा म्हणून 5000 दिरहम म्हणजे जवळपास 96 हजार रुपयांचा दंड भरण्यास सांगितले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 2017 मध्ये ही घटना घडली आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर काम करणाऱ्या एका 27 वर्षीय व्यक्तीवर दोन आंबे चोरण्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणाची चौकशी करताना विमानतळावरील सुरक्षा रक्षकाने सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले. त्यावेळी एक व्यक्ती प्रवाशाची बॅग उघडून त्यातून दोन आंबे चोरताना दिसत आहे. त्या व्यक्तीने चोरणाऱ्या व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली. चौकशी दरम्यान व्यक्तीने दोन आंबे चोरल्याचं कबूल केलं. दोन वर्षापूर्वी झालेल्या या घटनेची आता कोर्टात सुनावणी झाली. त्यावेळी कोर्टाने नुकसान भरपाई म्हणून 5000 दिरहम म्हणजेच 96000 रुपयांचा दंड भरण्यास सांगितले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
8,800 रुपयांच्या 'पावती'विरोधात कोर्टात गेला अन् तीन वर्षांत किती 'पावत्या' फाटल्या तुम्हीच बघा!
सध्या देशभरात ट्रॅफिकच्या नव्या नियमांमुळे लोकांना नियम तोडणं चांगलंच महागात पडत आहे.लोकांना भराव्या लागलेल्या अव्वाच्या-सव्वा दंडावरूनही चर्चा सुरू आहे. अशातच ब्रिटनमधील एक घटना समोर आली आहे. ब्रिटनमध्ये राहणारे 71 वर्षीय रिचर्ड कीडवेल यांना वेगाने गाडी चालवल्याने दंड पडला होता. त्यांना 100 पाउंड म्हणजेच साधारण 8,800 रूपये दंड लावला. मात्र, हा दंड न भरता या विरोधात ते कोर्टात गेले. कोर्टात केस चालवण्यासाठी त्यांना तब्बल 30 हजार पाउंड म्हणजेच 26.6 लाख रूपये खर्च आला. पण इतका खर्च करूनही ते केस हरले.
बाबो! एका बीअरसाठी हॉटेलने घेतले 50 लाख रुपये, ग्राहक हैराण!
मॅन्चेस्टरच्या एका हॉटेलमध्ये ऑस्ट्रेलियाच्या पत्रकाराकडून एका बीअरसाठी तब्बल 50 लाख रूपये वसूल करण्यात आले. या घटनेनंतर चांगलाच गोंधळ उडाला. पत्रकार पीटर लालोर ऑस्ट्रेलियाच्या एका वृत्तपत्रात स्पोर्ट एडिटर आहेत. पीटर लालोर एशेज टेस्ट सीरिज कव्हर करण्यासाठी ब्रिटनला गेले होते. हॉटेलमध्ये मित्रांसोबत बसलेले असताना त्यांनी त्यांच्यासाठी एक बीअर ऑर्डर केली. ज्यावेळी पीटर या बीअरचं बिल देत होते. त्यावेळी त्यांनी चष्मा घातलेला नव्हता. दरम्यान पेमेंट मशीनमध्ये काही गडबड झाली आणि बिल पेड झालं. जेव्हा नंतर तेथील स्टाफने बिलाची स्लीप पाहिली तेव्हा तो हैराण झाला. त्याने पीटर लालोरला सांगितलं की, तुमच्याकडून 50 लाखांपेक्षा अधिक बिल पे झालं आहे.