वाळवंटी शहर दुबईत महापूर: रस्ते, गाड्या, घरे पाण्याखाली; पाहा धक्कादायक Videos...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2023 06:26 PM2023-11-18T18:26:52+5:302023-11-18T18:30:27+5:30
Dubai Deluge: वाळवंटी शहरात अचानक महापूर आल्यामुळे हवामान तज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.
Dubai Floods: दुबई अतिशय सुंदर आणि स्वच्छ शहरांच्या यादीत येते. पण, सध्या हेच दुबई शहर पाण्याखाली आले आहे. या जगातील सर्वात सुंदर वाळवंटी शहरात चक्क महापूर आला आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे दुबईत अनेक ठिकामी पाणी साचले आहे. हवामानात अचानक झालेल्या या बदलाचे कारण शोधले जात आहे.
Floods in Dubai and Saudia pic.twitter.com/RAVIGqbYGy
— Lucy Ambati (@AmbatiLucy) November 18, 2023
हवामानातील अशा अचानक बदलामुळे शास्त्रज्ञ आणि जगभरातील तज्ञही आश्चर्यचकित झाले आहेत. दुबई प्रशासनाने आपल्या नागरिकांना समुद्रकिनाऱ्यावर जाण्यास मनाई केली आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे जमीन खचण्याचा धोका आहे. त्यामुळे दुबई पोलिसांनी लोकांना चिखल आणि वाळू असलेल्या भागात न जाण्यास सांगितले आहे. अशा ठिकाणी फ्लॅश फ्लड म्हणजेच अचानक पूर देखील येऊ शकतो.
The conditions after heavy rain in Dubai, UAE 🇦🇪 | 17 November 2023 | #floods#flooding#Dubai#UAEpic.twitter.com/LKwy6lVCAl
— Disaster Tracker (@DisasterTrackHQ) November 17, 2023
हवामान सतत गंभीर होत आहे, त्यामुळे संयुक्त अरब अमिरातीच्या राष्ट्रीय हवामान केंद्राने यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स, हवामान बदल आणि ग्लोबल वॉर्मिंग ही हवामान बदलाची कारणे मानली जातात. या खराब हवामानामुळे संपूर्ण यूएईमध्ये वाहतूक विस्कळीत झाली आहे. विशेषतः दुबईत. रस्त्यावरून वाहनांची ये-जा करण्यात अडचण येत आहे. तर, उड्डाणेही बंद करण्यात आली आहेत.
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही दुबई पूराचा व्हिडिओ शेअर केला आहे:-
वाहतूक नियंत्रणासाठी दुबई पोलीस कसोशीने प्रयत्न करत आहेत. दुबईचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्हिडिओ इतके भयानक आहेत की तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. पूरस्थिती गंभीर होऊ नये यासाठी दुबई पालिकेने तयारी केली आहे. पाण्याच्या पातळीत वाढ किंवा घट झाल्याची माहिती लोकांना दिली जात आहे.
Major flood on the streets due to heavy rains in the Dubai, UAE 🇦🇪 (17.11.2023)
Source: Saudi Weather gr
TELEGRAM JOIN 👉 https://t.co/9cTkji5aZqpic.twitter.com/EgGLeMw8CF— Disaster News (@Top_Disaster) November 17, 2023
ड्रेनेज व्यवस्थेवर लक्ष ठेवले जात आहे, आणखी पाऊस पडल्यास काय करायचे यावरही लक्ष ठेवले जात आहे. संयुक्त अरब अमिरातीच्या सरकारने म्हटले आहे की, जर आणखी पाऊस झाला तर कार्यालये बंद केली जातील. लोक सोयीनुसार घरून काम करू शकता. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी ही तयारी करण्यात येत आहे.