Dubai Lottery Indian Winners: छप्परफाडपेक्षाही अधिक...! दोन भारतीयांना दुबईत लागली १६ कोटींची लॉटरी, एकाशी संपर्कच होत नाहीय...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 04:52 PM2022-12-21T16:52:03+5:302022-12-21T16:52:57+5:30

१९९९ नंतर दुबईत एवढी मोठी लॉटरी जिंकणारे २०१ आणि २०२ वे भारतीय नागरिक आहेत.

Dubai Lottery Indian Winners: Dubai Duty Free, Two Indian expats win 8 crores each, but one out of reach | Dubai Lottery Indian Winners: छप्परफाडपेक्षाही अधिक...! दोन भारतीयांना दुबईत लागली १६ कोटींची लॉटरी, एकाशी संपर्कच होत नाहीय...

Dubai Lottery Indian Winners: छप्परफाडपेक्षाही अधिक...! दोन भारतीयांना दुबईत लागली १६ कोटींची लॉटरी, एकाशी संपर्कच होत नाहीय...

googlenewsNext

दुबई आणि भारतीय विजेते असे गेल्या काही वर्षांपासून समीकरणच बनले आहे. दोन भारतीयांना प्रत्येकी ८ कोटींची लॉटरी लागली आहे. यात गंमत अशी की एकाशी दुबईच्या कंपनीचा संपर्कच होऊ शकलेला नाहीय. तर दुसरा गेली ३० वर्षे आपले नशीब आजमावत होता, त्याला वयाच्या ७६ व्या वर्षी लॉटरी लागली आहे. 

देनेवाला जब भी देता, देता छप्पर फाडके या गाण्याचे बोल प्रत्यक्षात आले आहेत. सफीर नावाचे भारतीय गृहस्थ गेल्या ४६ वर्षांपासून दुबईत राहत आहेत. गेली ३३ वर्षे ते तिथे वेगवेगळ्या लॉटरींचे तिकीट खरेदी करत आहेत. परंतू त्यांना यश आले नव्हते. तीन दशके पैसा लावून देखील ते जिंकत नव्हते, परंतू ते प्रयत्न हारले नाहीत. त्यांनी ३४ व्या वर्षी पुन्हा तिकीट खरेदी केले आणि त्याचे फळ त्यांना मिळाले. सफीर दुबईत फायर सेफ्टीशई संबंधीत सिस्टिम बनविणारी कंपनी चालवितात. लकी ड्रॉ जिंकल्यानंतर त्यांना अत्यानंद झाल्याचे ते म्हणाले आहेत. 

दुबई ड्युटी फ्रीची त्यांना लॉटरी लागली आहे. या कंपनीची ही सलग ३९ व्या वर्षीची लॉटरी होती. सफीर यांना १० लाख डॉलर मिळाले आहेत. तर अन्य एका भारतीय नागरिकाला ८ कोटींची लॉटरी लागली आहे. रॉयमिरांडा रोलेंट या व्यक्तीने भारतात परतण्यापूर्वी 1946 नंबरचे लॉटरी तिकीट खरेदी केले होते. २९ नोव्हेंबरला त्याला ही ल़ॉटरी लागली आहे, परंतू अद्याप त्याच्याशी संपर्क झाला नसल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे. 

रोलेंट आणि अहमद सफीर हे १९९९ नंतर दुबईत एवढी मोठी लॉटरी जिंकणारे २०१ आणि २०२ वे भारतीय नागरिक आहेत. महत्वाचे म्हणजे विजेत्यांची सर्वाधिक संख्या ही भारतीयांचीच आहे. DDF ने वर्धापन दिन साजरा केला होता. यानिमित्ताने कंपनीने १७ ते २० डिसेंबर या काळात दुबई इंटरनेशनल आणि मकतूम विमानतळावरून प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांना २५ टक्क्यांची सूट दिली होती. 

डीडीएफच्या अन्य चार विजेत्यांना लक्झरी कार मिळाल्या आहेत. रियाधला राहणाऱ्या ५६ वर्षीय आफ्रिकन नागरिकाला ऑडी A8L 3.0 कार मिळाली आहे. याच व्यक्तीला ऑगस्टमध्ये मर्सिडीज बेंझ एस500 कार मिळाली होती. त्याला एकाच वर्षात दोन खतरनाक गिफ्ट मिळाली आहेत. मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता, अशी त्याची प्रतिक्रिया राहिली आहे. 

Web Title: Dubai Lottery Indian Winners: Dubai Duty Free, Two Indian expats win 8 crores each, but one out of reach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dubaiदुबई