दुबईच्या राजाने पत्नीचा फोन केला हॅक, खुलाशानंतर कोर्टातच राजकुमारी हया बिंतचा उडाला थरकाप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 04:58 PM2021-10-07T16:58:25+5:302021-10-07T16:58:40+5:30

दुबईच्या शासकाने पत्नी आणि तिच्या वकिलांचं फोनवरील बोलणं ऐकलं होतं. याच्या माध्यमातून तो घाबरवण्याचा आणि धमकावण्याचा प्रयत्न करत होता.

Dubai ruler Sheikh Mohammed bin Rashid al-Maktoum hack ex wife phone divorce case | दुबईच्या राजाने पत्नीचा फोन केला हॅक, खुलाशानंतर कोर्टातच राजकुमारी हया बिंतचा उडाला थरकाप

दुबईच्या राजाने पत्नीचा फोन केला हॅक, खुलाशानंतर कोर्टातच राजकुमारी हया बिंतचा उडाला थरकाप

googlenewsNext

दुबईचा (Dubai King) राजा शेख मोहम्मद बिन राशी अल-मकतूमवर (Mohammed bin Rashid al-Maktoum) इस्त्रायली सॉफ्टवेअर पेगाससच्या माद्यमातून आपल्या घटस्फोटीत पत्नीचा फोन हॅक (Wife Phone Hack) करण्याचा आरोप लागला आहे. लंडनच्या हायकोर्टाने (London Court) शेख मोहम्मद आणि त्याची आधीची पत्नी राजकुमारी हया बिंत हुसैन (haya bint hussein) यांच्यात घटस्फोटाची केस सुरू आहे. बुधवारी कोर्टाने खुलासा केला की, दुबईच्या शासकाने पत्नी आणि तिच्या वकिलांचं फोनवरील बोलणं ऐकलं होतं. याच्या माध्यमातून तो घाबरवण्याचा आणि धमकावण्याचा प्रयत्न करत होता. शेख मोहम्मद हे यूएईचे उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान आहेत.

कोर्टाने आपल्या निर्णयात सांगितलं की, हॅकिंगसोबतच दुबई शासकासाठी काम करणाऱ्यांनी लंडनमध्ये हयाच्या प्रॉपर्टीजवळ एक हवेली खरेदी करण्याचाही प्रयत्न केला. कोर्टाचा निर्णय ऐकल्यावर हया बिंत फारच घाबरलेली आहे. तिला स्वत:ला शिकार, असुरक्षित वाटत आहे.

जज एंड्रूयू मॅकफारलेन म्हणाले की, कमीत कमी ६ फोनवर लक्ष ठेवण्यात आलं होतं. जज असंही म्हणाले की, शेख मोहम्मदने आपल्या पत्नीला केवळ ब्रिटनला रवाना होण्यासाठी त्रासच दिला नाही तर त्यानंतरही त्रास दिला. याआधी मार्च २०२० मध्ये जज मॅकफारलेन यांनी ही शंका व्यक्त केली होती की, अब्जाधीश शेख मोहम्मदने त्याच्या दोन मुलींच्या अपहरणाचा आदेश दिला होता.

७२ वर्षीय मोहम्मदची ४७ वर्षीय पत्नी हयासोबत मुलांच्या कस्टडीवरून लांब कायदेशीर लढाई सुरू आहे. यात बरेच पैसेही खर्च झाले आहेत. हया आपल्या दोन मुलांसोबत म्हणजे १३ वर्षीय जलीला आणि ९ वर्षीय जायदसोबत ब्रिटनमध्ये पळून गेली होती. ती म्हणाली होती की तिला तिच्या सुरक्षेची भिती आहे. तिचं तिच्या एका ब्रिटीश बॉडीगार्डसोबत अफेअरही होतं.
 

Web Title: Dubai ruler Sheikh Mohammed bin Rashid al-Maktoum hack ex wife phone divorce case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.