दुबईच्या शेखला घटस्फोट पडला ५,५०० कोटींत; ब्रिटनमधील सगळ्यात महाग कौटुंबिक वाद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 08:23 AM2021-12-23T08:23:21+5:302021-12-23T08:24:37+5:30

दुबईचे राज्यकर्ते शेख मोहम्मद बिन राशीद अल मकतूम यांना त्यांच्या पत्नीपासून घटस्फोट (तलाक) फारच महागात पडला आहे.

dubai sheikh divorced for rs 5500 crore The most expensive family dispute in Britain | दुबईच्या शेखला घटस्फोट पडला ५,५०० कोटींत; ब्रिटनमधील सगळ्यात महाग कौटुंबिक वाद

दुबईच्या शेखला घटस्फोट पडला ५,५०० कोटींत; ब्रिटनमधील सगळ्यात महाग कौटुंबिक वाद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली :दुबईचे राज्यकर्ते शेख मोहम्मद बिन राशीद अल मकतूम यांना त्यांच्या पत्नीपासून घटस्फोट (तलाक) फारच महागात पडला आहे. त्यांना मुलांचा ताबा मिळण्यासाठीचा वाद मिटवण्यासाठी माजी पत्नीला ५५४ दशलक्ष पाउंडपेक्षाही (५,५०० कोटी रुपये) जास्त रक्कम द्यावी लागेल, लंडनच्या उच्च न्यायालयाचे न्यायाधीश फिलिप मूर म्हणाले की, ‘जॉर्डनचे राजे अब्दुल्ला यांची सावत्र बहीण राजकुमारी हया बिन्त अल हुसैन आणि या जोडप्याच्या दोन मुलांना दिल्या जाणाऱ्या मोठ्या रकमेचा मुख्य उद्देश त्यांची आजीवन सुरक्षा सुनिश्चित करण्याचा आहे. राजकुमारी हया (४७) आणि त्यांच्या दोन मुलांच्या आयुष्याला शेखकडून असलेला धोका पाहता ही रक्कम त्यांना दिली जात आहे.’

जज फिलिप मूर म्हणाले की, ‘ते सुरक्षेशिवाय स्वत:साठी कोणतीही रक्कम मागत नाही. घटस्फोट झाल्यामुळे हया यांचे जे नुकसान झाले फक्त त्याची भरपाई मागत आहेत.’ मूर यांनी शेख मोहम्मद यांना तीन महिन्यांच्या आत त्यांना त्यांच्या ब्रिटिश हवे लीच्या देखरेखीसाठी २५१.५ दशलक्ष पाउंड एकरकमी देण्याचा आदेशही दिला. राजकुमारी ह्या त्यांचे त्यांच्या एका अंगरक्षकावर प्रेम जडले. त्यानंतर असुरक्षित वाटल्यामुळे त्या एप्रिल २०१९ मध्ये ब्रिटनला पळून गेल्या होत्या. यानंतर एका महिन्याने त्यांनी शेखकडे घटस्फोट मागितला.

रक्कम निम्मीही नाही

ब्रिटनमध्ये कौटुंबिक वादाच्या खटल्यात मिळालेली ही सगळ्यात मोठी रक्कम असल्याचे लंडनमधील वकिलांचे म्हणणे आहे. हया यांनी १.४ अब्ज पाउंड भरपाईची मागणी केली होती. त्याच्या निम्मेही त्यांना मिळालेले नाहीत.
 

Web Title: dubai sheikh divorced for rs 5500 crore The most expensive family dispute in Britain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.