व्हिडीओ : जगातील सर्वात उंच इमारतीवर महात्मा गांधींचे छायाचित्र, अनोखी आदरांजली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2018 09:00 AM2018-10-03T09:00:40+5:302018-10-03T09:53:14+5:30

महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त जगातील सर्वात उंच इमारत असलेल्या बुर्ज खलिफावर गांधीजींचे छायाचित्र आणि तिरंग्याची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

Dubai's Burj Khalifa was lit up with Mahatma Gandhi's picture and quotes on his 150th birth anniversary | व्हिडीओ : जगातील सर्वात उंच इमारतीवर महात्मा गांधींचे छायाचित्र, अनोखी आदरांजली

व्हिडीओ : जगातील सर्वात उंच इमारतीवर महात्मा गांधींचे छायाचित्र, अनोखी आदरांजली

Next

दुबई - महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त जगातील सर्वात उंच इमारत असलेल्या बुर्ज खलिफावर गांधीजींचे छायाचित्र आणि तिरंग्याची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. संयुक्त अरब अमीराती (यूएई) ने महात्मा गांधींना अशा प्रकारे अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे. भारत सरकारने यूएईचे याबद्दल आभार मानले आहेत. 



दुबईतील बुर्ज खलिफा ही उत्तुंग इमारत गांधीजींच्या छायाचित्रासह  तिरंग्यात न्हाऊन निघाली. या इमारतीच्या अधिकृत ट्विटरअकाऊंटवरून बुर्ज खलिफाचा फोटो ट्विट करून गांधी जयंतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. तसेच दरवर्षी भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त दुबईमधल्या बुर्ज खलिफाला तिरंग्याची विद्युत रोषणाई करण्यात येते.

Web Title: Dubai's Burj Khalifa was lit up with Mahatma Gandhi's picture and quotes on his 150th birth anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.